जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी यवतमाळमधील तरुणाचे थेट टॉवरवर चढून आंदोलन

आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी यवतमाळमधील तरुणाचे थेट टॉवरवर चढून आंदोलन

आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी यवतमाळमधील तरुणाचे थेट टॉवरवर चढून आंदोलन

यवतमाळ (Yawatmal) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर (Youth Agitation on Tower) चढून आंदोलन केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 10 मे : यवतमाळ (Yawatmal) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर (Youth Agitation on Tower) चढून आंदोलन केले आहे. श्याम गायकवाड असे या आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या आंदोनलामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तरुणाची मागणी नेमकी काय - यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील अतिक्रमण हटवून ती जागा गरिबांना देण्यात यावी, अशी मागणी एका तरुणाने केली आहे. आपल्या या मागणीसाठी या तरुणाने वेगळीच शक्कल लढवली. या तरुणाने आपली मागणी पूर्ण व्हावी म्हणून थेट जिल्हाधिकारी परिसरातील टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. श्याम गायकवाड असे या आंदोलन करणाऱ्या युवकाचे नाव आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील शेत सर्व्हे नंबर 7 या शाळेच्या जमिनीवर आणि काही शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवून ती जागा गरिबांना देण्यात यावी, शिवाय आपल्यावरील आत्महत्येच्या प्रयत्नाचा जुना गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या तरुणाने केली होती. मात्र, त्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या या तरुणाने थेट आंदोलनाची भूमिका घेतली. हेही वाचा -  घराबाहेर झोपलेल्या तरुणाचा झोपतेच चिरला गळा, साताऱ्यातल्या घटनेनं खळबळ

आज सकाळी तो आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी परिसरातील टॉवरवर चढला. ही बाब काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस यंत्रणेसह निवासी जिल्हाधिकारी, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्या तरुणाची समजूत काढून त्याला टॉवरवरून उतरविण्याचा प्रयत्न केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात