तुषार शेटे, मुंबई, 22 जुलै : राज्यात सध्या विविध भागात पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराची स्थिती आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पुराचे पाणी आले आहे. यामुळे वाहतूक बंद असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, आपत्तीच्या काळात सोशल मीडियासारख्या प्रभावी माध्यमाचा योग्य वापर केल्यानं दोघांना वाचवण्यासाठी मदत झाल्याचं समोर आलंय. एका मेसेजमुळे वेळेत मदत पोहोचू शकली आणि कवठेबाजार इथंल दाम्पत्य वाचलं.सोशल मीडिया आणि व्हाट्सअपचा योग्य पध्दतीने वापर केला गेला तर नागरिकांचा जीव वाचू शकतो हे यवतमाळच्या घटनेवरून सिध्द झालंय. यवतमाळ जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पालकमंत्री संजय राठोड हे कार्यालयीन कामानिमित्त मुंबईत जरी असले तरीही त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. पालकमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. विशाल राठोड हे सुध्दा रेस्क्यू ऑपरेशनकडे जातीने लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासह SDRF आणि बचाव कार्यात उरतेलल्या सेवाभावी संस्थाचं समन्वय करण्याचं काम ते करत आहेत.
पुण्याच्या प्रज्ञावर्धिनी संस्थेत काम करणाऱ्या शरद चौधरी यांचा डॉ. विशाल राठोड यांना दुपारी 1 च्या सुमारास व्हॉट्सअपवर मेसेज आला. त्यात आर्णीतल्या कवठाबाजार भागात कार्लेवाड दाम्पत्य पुरात अडकलं असून त्यांना मदतीची गरज असल्याचं सांगितलं. डॉ. राठोड यांनी त्वरित पावलं उचलंत तो मेसेज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना पाठवला. फक्त मेसेज फॉरवर्ड करून राठोड थांबले नाहीत. तर यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते फॉलोअप घेत राहिले. गुजरातमध्ये पावसाने हाहाकार, शहरांमध्ये घुसले पाणी; गायी, गाड्या गेल्या वाहून, VIDEO VIRAL अवघ्या दीड तासात म्हणजे दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधिक्षक पवन बनसोड या दोघांचा कार्लेवाड कुटुंबियांना पुरातून सुखरूप वाचवल्याचा मेसेज आला. यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाचा योग्य पध्दतीने वापर केला गेला तर तो फायदेशीर ठरू शकतं हेच यातून दिसून येतंय.