यवतमाळ, 14 डिसेंबर : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथे असली नकलीच्या मुद्द्यावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. एवढेच नव्हे तर वाद सुरू असताना काही तृतीयपंथी भर रस्त्यात अर्धनग्न झाल्याने परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. या सर्व राड्यामुळे वाहतूक सुद्धा खोळंबली होती. हा सर्व प्रकार जवळ पास दीड तास सुरू होता.
सोमवार हा आर्णीकरांसाठी आठवडे बाजाराचा दिवस असतो. आजुबाजूच्या 35 ते 40 गावातील लोक बाजारासाठी आर्णीमध्ये येतात. बाजाराचा दिवस असल्या कारणाने तृयीयपंथी सुद्धा या ठिकाणी पैसे मागण्यासाठी मोठी गर्दी करतात. आज यवतमाळहून काही तृतीयपंथी आर्णी बाजार पेठेत गेले असता त्या ठिकाणी आधीच तृतीयपंथीयांचा एक गट रस्त्याने लोकांना पैसे मागत फिरत होता.
तेव्हा या दोन्ही गटात असली-नकलीवरून वाद झाला. या वादाचं रुपांतर नंतर हाणामारी झालं. भर रस्त्यात हा प्रकार जवळ पास दीड तास सुरू होता. त्यातील काहींनी तर रस्त्यातच अंगावरील कपडे काढले. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
दरम्यान, या वादातूनच एका तृतीयपंथीयाने शहरातून वाहणाऱ्या अरुनावती नदीत 30 फूट खोल उडी घेतली. त्यामुळे तो जखमी झाला.