अजुन निर्णय झालाच नाही, मात्र वाईन शॉप्स मालकांनी सुरू केली ही तयारी

अजुन निर्णय झालाच नाही, मात्र वाईन शॉप्स मालकांनी सुरू केली ही तयारी

सोशल डिस्टन्सिंगसाठीचे आराखडेही तयार करण्यात येत आहेत. तर मद्य प्रेमींचे डोळे सरकारच्या निर्णयाकडे लागले आहेत.

  • Share this:

कोल्हापूर 25 एप्रिल: लॉकडाऊनचा आजचा 32वा दिवस आहे. गेल्या महिनाभरापासून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सगळं काही बंद आहे. लॉकडाऊन केव्हा हटविला जाणार? त्यानंतर काय होणार? नियम काय असतील? या सगळ्या गोष्टींची चर्चा सध्या सुरू आहे. यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती दारुची दुकाने सुरु होतील का? याची. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात वाईन शॉप्स मालकांनी तयारीला सुरुवातही केली आहे.

काही राज्यांच्या मुख्यंत्र्यांनी केंद्राला विनंती करून दारुची दुकाने सुरु करण्याची मागणी केली होत. महसुलाचे सगळेच स्रोत बंद झाल्याने तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे दारुच्या दुकानांना परवानगी देण्याचा विचार करण्यास हरकत नाही असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं.

त्यावर महाराष्ट्रात जोरदार चर्चाही सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच शहरामध्ये दारू दुकानांसमोरच्या हालचालीना वेग आलाय. साफसफाईला सुरूवात झाली असून सोशल डिस्टन्सिंगसाठीचे आराखडेही तयार करण्यात येत आहेत. तर मद्य प्रेमींचे डोळे सरकारच्या निर्णयाकडे लागले आहेत.

  हे वाचा - कोरोनाचा धोका वाढल्यानंतर अजित पवार पुण्यात, दिल्या 9 महत्त्वपूर्ण सूचना

लॉकडाऊन सुरू असतानाही देशात कोरोनाचा वेग मंदावला मात्र थांबलेला नाही. दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढच होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातल्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा IIT दिल्ली अभ्यास करत असून त्यासाठी त्यांनी PRACRITI हा डॅशबोर्ड तयार केला आहे. देशातल्या सात राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त वेगाने कोरोना पसरत असल्याचं त्यात आढळून आलं असून त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. तर गुजरात या राज्यामध्ये इन्फेक्शन पसरण्याचं प्रमाण सर्वात जास्त असल्याचंही आढळून आलं आहे.

सर्वाधिक वेगाने कोरोना पसरत असलेल्या राज्यांमध्ये झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आणि गुजरात ही ती राज्य असून देशातल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन तृतिआंश रुग्ण हे या राज्यांमध्ये आहेत. देशातल्या 19 राज्य आणि 100 जिल्ह्यांमध्ये 60 टक्के कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गुजरातमध्ये कोरोनाबाधित रुग्णामुळे इन्फेक्शन पसरण्याचा वेग हा 3.3 एवढा असून तो देशात सर्वात जास्त आहे. तर अशा प्रकारचं इन्फेक्शन पसरण्याची राष्ट्रीय सरासरी ही 1.8 एवढी आहे.

हे वाचा - पाण्यापेक्षाही स्वस्त झाल्या कच्च्या तेलाच्या किंमती, भारतात दर कमी होणार का?

गुजरातमध्ये शुक्रवार पर्यंत बाधितांची संख्या 2,815 एवढी झाली आहे. सगळी राज्य सरकारे युद्ध पातळीवर कोरोनाविरुद्ध लढाई लढत असून काही राज्यांनी त्यात यश मिळवलं आहे. तर काही राज्यांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे.

 

First published: April 25, 2020, 5:16 PM IST
Tags: wine shop

ताज्या बातम्या