मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकारी आश्रमशाळेत दहावीची मुलगी गर्भवती; रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

सरकारी आश्रमशाळेत दहावीची मुलगी गर्भवती; रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

आदिवासी विकास प्रकल्प जव्हारअंतर्गत येणाऱ्या शासकीय कन्या आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

आदिवासी विकास प्रकल्प जव्हारअंतर्गत येणाऱ्या शासकीय कन्या आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

आदिवासी विकास प्रकल्प जव्हारअंतर्गत येणाऱ्या शासकीय कन्या आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

पालघर, 12 मार्च : आदिवासी विकास प्रकल्प जव्हारअंतर्गत येणाऱ्या शासकीय कन्या आश्रमशाळा साकुर येथील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (10th girl pregnant in ashram school. The case unfolded after the bleeding started)

जव्हार तालुक्यातील शासकीय कन्या आश्रमशाळेत बुधवारी एका मुलीला शाळेत असताना रक्तस्राव व उलट्यांचा त्रास होऊ लागल्या. यानंतर तिला प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी ती गर्भवती असल्याचं समोर आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान तिला खूप रक्तस्राव सुरू झाल्या. मात्र तिची प्रकृती खालावत असल्याचं निदर्शनास आल्यास गुरुवारी तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिची वैद्यकीय चाचणी केली असता ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं उघडकीस आले. सध्या तिच्यावर नाशिक येथे पुढील उपचार सुरू आहेत.  तिच्या सोबत शाळेतील महिला अधीक्षक व मुलीचे पालक सोबत आहेत. (10th girl pregnant in ashram school. The case unfolded after the bleeding started)

हे ही वाचा-नसबंदीनंतरही पाचव्यांदा गर्भवती राहिली महिला, डॉक्टरकडे केली अकरा लाखाची मागणी

शासकीय आश्रमशाळा साकुर येथे पाहिली ते बारावी पर्यंतनिवासी कन्या शाळा आहे. येथे नववी ते बारावीचे वर्ग सुरू असून वसतिगृहात 156 विद्यार्थी पट संख्या आहे. तर शाळेत 115 विध्यार्थी उपस्थितीत आहेत. ही मुलगी 7 फेब्रुवारीपासून शाळेत उपस्थित आहे. तिच्या पालकांनी याबाबत गावातल एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते, लॉकडाऊन काळात हा प्रकार घडल्याचे पालकांनी कबुल केले असल्याची माहिती साकुर आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. भुसारा यांनी सांगितले.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Nashik, Palghar, Pregnancy, Shocking news