पुणे, 24 ऑक्टोबर : पुण्यात सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते कोथरूड मतदारसंघात. चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर शिंदे यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. गेल्यावेळी भाजपने पुणे शहरातील 8 ही जागा जिंकल्या होत्या. याशिवाय कसबा, शिवाजीनगर, हडपसर, कॅन्टोन्मेट, खडवासला, पर्वती, वडगावशेरी येथील लढतीही चुरशीच्या झाल्या आहेत. live Update : -इंदापूरमधून भाजपचे हर्षवर्धन पाटील 2700 मतांनी पिछाडीवर -पुण्यात चंद्रकांत पाटील आघाडीवर असून मनसेचे किशोर शिंदे पिछाडीवर आहेत. -शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे पिछाडीवर असून भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. -बारामतीमधून राष्ट्रवादीचे अजित पवार पहिल्या फेरीमध्ये 6589 मतांनी आघाडीवर -दुसरीकडे अजित पवार आघाडीवर आहेत.पुण्यातील काँग्रेस उमेदवार रमेश बागवे यांनी सुरुवातीच्या फेरीत आघाडी घेतली आहे. -भोसरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार महेश लांडगे हे आघाडीवर आहेत. सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा त्यांनी ही आघाडी घेतली आहे. -कर्जत जामखेडमध्ये भाजप उमेदवार राम शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे रोहित पवार मागे पडले आहेत. - बारामतीमध्ये यंदा राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिष्ठेची लढत होत आहे. पहिला कल हाती आला तेव्हा अजित पवार यांनी आघाडी घेतली आहे. पुणे जिल्ह्यातील परिस्थिती : पुणे शहरात केवळ 48 टक्के मतदान झालं असून ग्रामीण भागात 66 टक्के मतदान झालंय. इथं अजित पवार, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. कर्जत जामखेड येथील राम शिंदे विरुद्ध रोहित पवार या लढतीकडे ही साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात 27 जागा भाजपला तर 16 जागा शिवसेनेला मिळतील. तर आघाडीच्या जागा कमी होण्याची चिन्हे असून काँग्रेसला 7 तर राष्ट्रवादीला 15 आणि इतर एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 66 विधानसभेच्या जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 12, भाजपला 22, राष्ट्रवादीला 18, काँग्रेसला 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष असे प्रत्येकी एक जागा जिंकली होती. त्याआधी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 23 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजप 10 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या होत्या. तर तब्बल 7 जागी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकपा आणि एमएनएसला एक जागा मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीत काय झालं? 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.