जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खान्देशी लोकगीतांची संस्कृती जपणारी महिला, त्यांची धडपड पाहून वाटेल अभिमान Video

खान्देशी लोकगीतांची संस्कृती जपणारी महिला, त्यांची धडपड पाहून वाटेल अभिमान Video

खान्देशी लोकगीतांची संस्कृती जपणारी महिला, त्यांची धडपड पाहून वाटेल अभिमान Video

बदलत्या काळात लोकगीतांची संस्कृती लोप पावत आहे. पण, या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी नंदूरबार जिल्ह्यातील सविता पटेल प्रयत्न करत आहेत.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 16 जानेवारी :  भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांमध्ये एक महत्त्वाच्या संस्कार म्हणजे विवाह संस्कार. लग्न जुळल्यापासून ते विवाह सोहळ्यापर्यंत अनेक विधी पार पडत असतात. साखरपुडा, हळद,ओटी भरणे असे विविध विधी प्रसंगी ज्या लोकगीतांचे गायन होते त्यातून लोकजीवनाचा ,लोकसंस्कृतीचा परिचय होतो. तसेच देवाबद्दल असणाऱ्या श्रद्धेचं, भावनेचे वेगळेपण देखील यामध्ये दिसतं. बदलत्या काळात लोकगीतांची संस्कृती लोप पावत आहे. पण, या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी नंदूरबार जिल्ह्यातील सविता पटेल प्रयत्न करत आहेत. काय असतो उद्देश? विवाह संस्कारात सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न मंडपात विधिवत यज्ञ, होम- हवन, ग्रहशांती, सोबत  विवाह संपन्न होत असतो. हा विवाह म्हटला म्हणजे आठ दिवस आधीपासून कार्यक्रमांची रेलचेल असते. या कार्यक्रमात सगे-सोयरे, आप्तेष्ट,मित्रमंडळी येत असतात. हा सर्व आनंद व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत. यापैकी खास करून महिला वर्गात लग्नसमारंभात लोकगीतं गायली जातात. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांचे ,मनोरंजन व्हावे ,तसेच गमती -जमती व्हाव्यात या उद्देशाने लोकगीते गायली जातात. विवाहाच्या निमित्तानं वधू आणि वर पक्षाची कुटुंब तसाच त्यांचा मित्रपरिवार एकत्र येते. त्यांच्यात मैत्री, आपुलकीचं नातं निर्माण होतं. भाषिक सलोखा वाढतो. वरपक्षाकडील मंडळी त्यांच्या घरी लक्ष्मी येणा म्हणून आनंदात असतात. हा आनंद लोकगीतामधून व्यक्त होता. या गाण्यातून नववधूला सासरी गेल्यावर वाहण्याच्या टिप्स दिल्या जातात. लग्नात दिसाल आणखी परफेक्ट! पैठणीपासून पुरुषांसाठीही आहेत अनेक पर्याय, Video कसं केलं लोकगीताचं संकलन? ही गाणी यापूर्वी  कुठंही लिहिलेली नव्हती. ही गाणी तोंडी गायली जायची. मौखिक पद्धतीनंच  एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संक्रमित होत असत. आजीबाईंची ही गाणी नव्या युगात टिकून राहावी यासाठी डॉ. सविता पटेल यांनी गाणी संकलित करायला सुरुवात केली. त्यांनी या लोकगीतांवर संशोधनही केलं आहे. यापूर्वी जे दृश्य डोळ्यासमोर ठेवून महिला गाणी तयार करत आणि गात ती संस्कृती हळूहळू लुप्त होत आहे, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे हे संशोधन करण्याचं मी ठरवलं, असं डॉ. सविता पटेल यांनी सांगितलं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    या गाण्यांचे कुठंही रेकॉर्ड नव्हतं. त्यामुळे त्या संकलन करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. त्यासाठी मी वेगवेगळ्या गावात प्रवास केला. त्या गावातील वृद्ध महिलांशी संवाद साधला. त्यांची गाणी रेकॉर्ड केली. इतकंच नाही तर महिलांनी ती गाणी गावी म्हणून त्यांच्यासमोर तो प्रसंग हुबेहुब उभा केला जात असे, असंही पटेल यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात