जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ट्रक पुलाखाली कोसळला अन् घात झाला, आग लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं

ट्रक पुलाखाली कोसळला अन् घात झाला, आग लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं

ट्रकचा अपघात

ट्रकचा अपघात

हा ट्रक वाशिम जिल्ह्यातून कारंजा इथे निघाला होता. त्याच दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रतिनिधी किशोर गोमाशे, वाशिम : समृद्धी महामार्गावरील कारंजा ते दोनद दरम्यान जात असणारा ट्रक पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे. या घटनेत ट्रकमधील दोन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा ट्रक वाशिम जिल्ह्यातून कारंजा इथे निघाला होता. त्याच दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. हा ट्रक नाशिक जिल्ह्यातून कांदा भरून पश्चिम बंगालच्या कोलकत्ता इथं जात होता.

News18

भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून हा ट्रक समृद्धी महामार्गावरील एका पुलाखाली कोसळला त्यामुळे या ट्रकला आग लागली आणि त्यामध्ये चालक आणि त्याचा सहकारी हे दोघेही होरपळल्याने दोघांचे ही मृतदेह कोळसा झालेत. या दोघांची अद्याप ओळख पटली नसून कारंजा पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघाताचा अजून कारण समजू शकलं नाही. यामध्ये कांदे भरल्याचं दिसत आहे. आगीमुळे कांद्याचं आणि ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात