Home /News /maharashtra /

शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन केली आत्महत्या, पोलिसांच्या हाती लागली सुसाईड नोट

शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन केली आत्महत्या, पोलिसांच्या हाती लागली सुसाईड नोट

जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

वाशिम, 11 डिसेंबर : वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन भाऊराव खुपसे ( वय 40 ) असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव असून वर्ग खोलीतच गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं. शिक्षक सचिन खुपसे यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. पोटदुखीमुळे त्रस्त असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. शाळेतच शिक्षकाने गळफास घेतल्याच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सचिन भाऊराव खुपसे हे मानोरा तालुक्यातील सोमठाणा इथंच राहणारे आणि तेथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत होते. सचिन खुपसे यांच्या पत्नीही शिक्षिका असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सचिन खुपसे हे मनमिळावू स्वभावामुळे सर्वांचे परिचित होते. त्यांनी आत्महत्या केल्याने शिक्षण श्रेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सचिन खुपसे यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत पोटदुखी च्या आजाराने त्रस्त असल्यामुळं आत्महत्या करीत असून आत्महत्येला कोणाला ही जबाबदार धरू नये असं लिहून ठेवण्यात आलं आहे. या आत्महत्येची फिर्याद प्रविण केशवराव खुपसे यांनी मानोरा पोलिसांत दिली असून पोलीस निरीक्षक शिशीर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार जगन्नाथ घाटे हे पुढील तपास करीत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Suicide, Washim, WASHIM NEWS

पुढील बातम्या