Home /News /maharashtra /

माहेरी जाताना भीषण अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न

माहेरी जाताना भीषण अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न

नवदाम्पत्य शिरपूर ते मालेगाव दरम्यान पोहोचले असता त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.

वाशिम, 14 ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यातील मालेगांव - हिंगोली या महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दुचाकी चालक शेख नजीर शेख मुसा ( 22 ) हा जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर त्याची पत्नी नाजीया ही जखमी झाली आहे. मालेगांव तालुक्यातील घाटा येथील रहिवासी असलेला शेख नजीर हा पत्नी नाजीया बी हिला घेऊन राजाकिन्ही येथे दुचाकी क्रमांक एम एच 37 एन 7975 ने जात होते. हे नवदाम्पत्य शिरपूर ते मालेगाव दरम्यान पोहोचले असता त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये शेख नजीर हा रस्त्याच्या बाजूला पुलाच्या बांधकामासाठी आणलेल्या दगडांवर जाऊन आदळल्यानं त्याला गंभीर इजा झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. अपघातात पत्नी नाजीया ही जखमी झाली असून तिला हिस शिरपूर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. या अपघाताचा शिरपूर पोलीस तपास करत आहेत. या दोघांचा महिन्याभरापूर्वी विवाह झाला होता. आज हे दाम्पत्य नजियाबी हिच्या माहेरी जात होते. मात्र वाटतेच पतीला काळाने गाठलं आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रस्ते वाहतुकीवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. या काळात अपघातांचं प्रमाणही कमी झालं होतं. मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर धावू लागली. त्यानंतर आता अपघातांच्या घटनाही वाढू लागल्या आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Washim, WASHIM NEWS

पुढील बातम्या