नरेंद्र मते/ वर्धा, 25 जुलै : समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत घटना घडताना दिसतात. मोबाइल आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा परिणाम युवकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात होत असतो. अशातच वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा शहरात सख्ख्या भावानेच बहिनीचे शोषण केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले असता पीडिता 6 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतीय संस्कृतीत काही नाती खूप पवित्र मानली जातात. त्यामध्ये आई-मुलगा व बहीण भावाचे नाते सामील आहे. मात्र वर्धा शहरात मानवतेला कलंकित करणारे प्रकरण समोर आले आहे. सख्या भावाने बहिणीवर अत्याचार केल्याची लाजीरवाणी घटना घडली आहे. 15 वर्षीय पीडिता घरी होती. तिचे आई वडिल बाहेर कामानिमित्त गेले होते. याची संधी साधून नराधम 17 वर्षीय भावाने बहिणीचं शोषण केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला घरच्यांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उजेडात आल्याने घरच्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली. शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने जबाब देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करीत होती. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपविण्यात आले. सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. तिला धीर देत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार पाणावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेचा जबाब नोंदविल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.