मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जलजीवन मिशन : नव्याने 19 पाणीपुरवठा कामांना मंजुरी

जलजीवन मिशन : नव्याने 19 पाणीपुरवठा कामांना मंजुरी

गोदावरीच हे विलोभनीय दृश्य..

गोदावरीच हे विलोभनीय दृश्य..

गोदामायने घेतला मोकळा श्वास ! अनेक जिवंत पाण्याचे स्रोत काँक्रीटीकरण मुक्त..

वर्धा: प्रत्येकाला पुरेसे आणि शुध्द पाणी उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात नव्याने 11 कोटी 84 खर्चाच्या 19 पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीत प्रस्तावांवर चर्चा झाल्यानंतर या कामांना मंजुरी देण्यात आली.बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक वाघ, वरिष्ठ भुवैज्ञानिक राजेश सावळे, पाणी पुरवठ्याचे उपविभागीय अभियंता विलास काळबांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जलजिवन मिशन अभियानांतर्गत प्रत्येकाला मुबलक आणि शुध्द पाणी मिळावे यासाठी ज्या गावांमध्ये कामे करणे आवश्यक आहे, अशा गावांचे प्रस्ताव तयार करून त्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मान्यता दिली जाते. जलजिवन मिशन अंतर्गत जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्याप्रमाणे पाणी पुरवठ्याची कामे केली जाणार आहे.जिल्ह्यात अनेक गावात नवीन पाणीपुरवठा योजना घेतल्या जात आहे. काही गावांमध्ये गरजेप्रमाणे नळजोडणीची तर काही ठिकाणी सुधारनात्मक पुनर्जोडणी, पाईपलाईन, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्थेची कामे करण्यात येणार आहे. या कामांमधून प्रत्येक नागरीकास आवश्यकतेप्रमाणे पाणी उपलब्ध करून द्यावयाचे आहे. यापुर्वी विविध टप्प्यात एकून 152 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. आज झालेल्या बैठकीत परिपुर्ण प्रस्ताव सादर झाल्याने आणखी 19 गावांचे प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहे. या मंजुरीमुळे आतापर्यंत मिशनमधून एकून 171 प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता झाली आहे.

बैठकीत नव्याने मंजुरी दिलेल्या 19 प्रस्तावांमध्ये हिंगणघाट तालुक्यातील वेळा, समुद्रपुर तालुक्यातील वायगाव, आष्टा, वर्धा तालुक्यातील धोत्रा रेल्वे, मिरापूर, धामनगाव (वा.), वायफळ, चिकणी, नागापूर, मांडवगड, देवळी तालुक्यातील बोपापूर (दिघी), हिरापूर, सरुळ, वाबगाव, वाटखेडा, शेंदरी, आर्वी तालुक्यातील जळगाव, सेलू तालुका खडकी (आमगाव), तामसवाडा या गावांचा समावेश आहे. या गावांच्या पाणीपुरवठ्यावर  11 कोटी 84 लक्ष रुपये खर्च केले जाणार आहे.दहा पाणी पुरवठा योजनांचा खर्च शासनाने निर्धारीत केलेल्या निकषापेक्षा जास्त असल्याने हे प्रस्ताव शासनास पाठविण्यात आले आहे. त्यात हिंगणघाट तालुक्यातील धोची, समुद्रपुर तालुक्यातील नांद्रा, वर्धा तालुक्यातील निमगाव, कुरझडी (जामठा), देवळी तालुक्यातील लोणी, कवठा (झोपडी), सैदापूर, आर्वी तालुक्यातील दिघी-सायखेडा-वडगाव पांडे, सेलू तालुक्यातील आमगाव (खडकी), दिंदोडा या गावांचा समावेश आहे.पाणी अत्यंत महत्वाचा विषय आहे. प्रत्येकास शुध्द आणि माणसी 55 लिटर पाणी देण्याचे शासनाचे धोरण आहे. योजनेच्या निकषाप्रमाणे योजनेंतर्गत गावांमध्ये पाणी पुरवठ्याची कामे झाली पाहिजे. हर घर नल से जल याप्रमाणे प्रत्येकास पाणी देणे आपले कर्तव्य असून त्यासाठी यंत्रणांनी युध्दपातळीवर काम करावे. जलजीवन अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे, या योजनेतून जिल्ह्यात पाणी पुरवठ्याचे उत्कृष्ट काम झाले पाहिजे, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी सांगितले.

First published:

Tags: Nashik