वर्धा, 15 जून: देशसेवा करण्यासाठी सैन्यात भरती व्ह्यायच आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये प्रवेश (All India Sainik School) प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या एन्ट्रन्स एक्झामसाठी (Entrance exam) साधारण 1 मार्च ला फार्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून त्यानंतर 15 मे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. सैनिक स्कूल ही भारतातील शाळांची एक प्रणाली आहे जी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सैनिक स्कूल सोसायटीद्वारे स्थापित आणि व्यवस्थापित केली जाते. सैनिक स्कूलचे उद्दीष्ट म्हणजे देशातील संरक्षण सेवांमध्ये अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांना नेतृत्व देण्यासाठी तयार करणे. अखिल भारतीय सैनिक शालेय प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून शाळा उज्ज्वल व आशादायक विद्यार्थ्यांची निवड करतात आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची रचना बाह्य क्रियांवर भर देतात. सैनिक शाळा संसाधने कॅडेट्सना खेळ, शैक्षणिक आणि इतर अभ्यासक्रमात त्यांचे कौशल्य विकसित करण्यास परवानगी देतात. सैनिक शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये रनिंग ट्रॅक, क्रॉस-कंट्री ट्रॅक, इनडोअर गेम्स, परेड मैदान, बॉक्सिंग रिंग्ज, फायरिंग रेंज, कॅनोइंग क्लब, हॉर्स राइडिंग क्लब, पर्वतारोहण क्लब, ट्रेकिंग आणि हायकिंग क्लब, अडथळे अभ्यासक्रम, फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट फील्ड यांचा समावेश असतो. वाचा :
अपेक्षेपलीकडचं यश! जिद्द अन् कष्टाच्या जोरावर अकोल्यातील मजुराच्या मुलाला बारावीत 92.67 टक्के; पहा VIDEO
मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे सैनिक शाळा उघडण्याचे उद्दिष्ट समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना राष्ट्राच्या सशस्त्र दलात अधिकारी म्हणून आणि इतर नामांकित व्यवसायांमध्ये चमकदार कारकीर्द करण्यास सक्षम करणे. शाळा कॅडेट्सच्या सर्वांगीण विकासावर भर देणे. येथे विद्यार्थ्यांना देशाच्या संरक्षण सेवांमध्ये अधिकारी म्हणून नेतृत्व करण्यास तयार केले जाते. आजचे विद्यार्थी उद्याचे चांगले आणि उपयुक्त नागरीक बनू शकतील, यासाठी येथे विद्यार्थ्यांमध्ये शरीर, मन आणि चारित्र्य हे गुण विकसित केले जातात. ज्यामुळे ते पालकांच्या आणि राष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात. दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच ग्रामीण भागातील मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे. गरीब कुटुंबातील मुले जर हुशार असतील तर त्यांना सर्वतोपरी मदत करुन पुढे पाठवणे. 6वीसाठी 45 विद्यार्थ्यांना प्रवेश इंडियन मिलिटरी स्कूल, पुलगाव शाळेचे प्राचार्य रवीकिरण भोजने म्हणाले की, “आमच्याकडे दरवर्षी 6वीसाठी 45 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 45 मुलांची दुसरी तुकडी आहे. ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश निशुल्क आहे तर इतरांसाठी 49 हजार 500 रुपये शुल्क असणार आहे. त्यामध्ये राहण्याची व्यवस्था, जेवण आणि शाळेसाठी लागणारे साहित्य दिली जातात.” पुलगाव शहरापासून 5 किमी अंतरावर इंडियन मिलिटरी स्कूल ही शाळा आहे. आर्वी रोडरुन शाळेत जाण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध आहेत.
गुगल मॅपवरुन साभार…
वाचा : Akola Special Report : हवामान विभागाचा अंदाज चुकला, त्यात आमचा काय दोष? शेतकरी हवालदिल! सैनिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी अटी सैनिक शाळेत फक्त मुलांनाच प्रवेश दिला जातो. जर तुम्हाला तुमच्या मुलाला सैनिक शाळेत दाखल करायचे असेल, तर तुम्ही सहावी अभ्यासादरम्यानच प्रवेश घेऊ शकता. या कालावधीतील मुलाचे वय 10 ते 15 वर्षे वर्षांपेक्षा जास्त नसावे. प्रवेश प्रक्रियेसाठी दरवर्षी एन्ट्रन्स एक्झाम घेतली जाते. यासाठी साधारपणे 1 मार्चला फाॅर्म भरण्याची तारीख ठरेल त्यानंतर 15 मे दरम्यान परीक्षा घेतली जाते. यात शारिरीक परीक्षा देखील घेतली जाते.