मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बापरे! पेट्रोल दिलं नाही म्हणून ऑफिसमध्ये सोडले कोब्रा नाग, VIDEOपाहून अंगावर येईल काटा

बापरे! पेट्रोल दिलं नाही म्हणून ऑफिसमध्ये सोडले कोब्रा नाग, VIDEOपाहून अंगावर येईल काटा

घटनेच्या वेळी ऑफिसमधल्या तीनही खोल्यांमध्ये माणसं काम करत होती. त्यात काही महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

घटनेच्या वेळी ऑफिसमधल्या तीनही खोल्यांमध्ये माणसं काम करत होती. त्यात काही महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

घटनेच्या वेळी ऑफिसमधल्या तीनही खोल्यांमध्ये माणसं काम करत होती. त्यात काही महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

बुलडाणा 13 जुलै: कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बुलडाणा शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. 7 ते 21 जुलैदरम्यान हा लॉकडाऊन असून त्यामुळे पेट्रोलपंपही बंद आहेत. दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या युवकांना पेट्रोल देण्यास मालकाने नकार दिला. त्याचा राग आल्याने या युवकांनी पेट्रोल पंप मालकाच्या तीन कॅबिन्समध्ये तीन विषारी कोब्रा नाग सोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आता त्या युवकांचा शोध घेत आहे. ही धक्कादायक घटना बुलडाण्याच्या मलकापूर रोडवरील असलेल्या चौधरी पेट्रोल पंपावर सायंकाळी चार वाजता घडली.

लॉकडाऊन असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच पेट्रोल देण्यात येत होतं. त्याचा राग या युवकांना होता. काळात ठराविक लोकांनाच पेट्रोल देण्यात येतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर ते युवक बाईकवरून पुन्हा पेट्रोल पंपावर आले आणि त्यांनी पंपावरच्या ऑफिसमधल्या तीनही खोल्यांमध्ये प्लॅस्टिकच्या बरणीत आणलेले साप सोडले.

त्यानंतर एकच खळबळ उडाली. तीनही खोल्यांमधले सर्व जण बाहेर आले आणि त्यांनी सर्पमित्रांना फोन केले. त्यांनी सर्व विषारी सापांना पकडण्यात यश मिळवलं.

पेट्रोल पंपचालकाने पोलिसांमध्ये तक्रार दिली असून पोलीस आता त्या दोन युवकांचा शोध घेत आहे. ऑफिसमधल्या तीनही खोल्यांमध्ये माणसं काम करत होती. त्यात काही महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. ती सगळी माणसं वेळीच बाहेर आल्याने अनर्थ टळला.

First published:
top videos

    Tags: Petrol pump