जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election Live Result : फडणवीस मंत्रिमंडळातले सात मंत्री पिछाडीवर

Maharashtra Election Live Result : फडणवीस मंत्रिमंडळातले सात मंत्री पिछाडीवर

Maharashtra Election Live Result : फडणवीस मंत्रिमंडळातले सात मंत्री पिछाडीवर

मुंबई 24 ऑक्टोंबर : सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला निर्णायक आघाडी असली तरी अनेक धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रीमंडळातले 6 दिग्गज मंत्री ही बातमी लिहित असताना पिछाडीवर होते. यात पंकजा मुंडे, राम शिंदे, मदन येरावार, अतुल सावे, भाळा भेगडे, अनिल बोंडे आणि रवींद्र चव्हाण या मंत्र्यांचा समावेश आहे. परळीतून पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतलीय तर कर्जत- जामखेडमधून भाजपचे राम शिंदे यांच्याविरुद्ध रोहित पवार यांनी आघाडी घेतलीय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 24 ऑक्टोंबर : सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला निर्णायक आघाडी असली तरी अनेक धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रीमंडळातले 6 दिग्गज मंत्री ही बातमी लिहित असताना पिछाडीवर होते. यात पंकजा मुंडे, राम शिंदे, मदन येरावार, अतुल सावे, भाळा भेगडे, अनिल बोंडे आणि रवींद्र चव्हाण या मंत्र्यांचा समावेश आहे. परळीतून पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतलीय तर कर्जत- जामखेडमधून भाजपचे राम शिंदे यांच्याविरुद्ध रोहित पवार यांनी आघाडी घेतलीय. निवडणुकीत हे महत्त्वाचं - राज्याच्या एकूण 288 जागांपैकी 62 जागा विदर्भात आहेत.  भारतातल्या 9 राज्यात असलेल्या एकूण मतदारसंघापेक्षा जास्त जागा फक्त विदर्भात आहे. - 1985 नंतर राज्यात कुठल्याही एका पक्षाला बहुमताची मॅजिक फिगर असलेला 145 चा आकडा गाठता आलेला नाही. - 1990 मध्ये काँग्रेस बहुमतापासून फक्त 4 जागा दूर होते. - 1995 पासून राज्यात युती किंवा आघाडीची  सरकारं यायला सुरुवात झाली. - 1995 मधलं युती सरकार हे महाराष्ट्रातलं पहिलं बिगर काँग्रेसी सरकार होतं. - नागपूर ही महाराषट्राची उपराजधानी असलेल्या विदर्भात लोकसभेचे 11 मतदारसंघ आहेत. - विदर्भाने महाराष्ट्राला मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस असे चार मुख्यमंत्री दिले. - विदर्भातल्या पुसद या मतदार संघातून वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री राज्याला मिळाले. - मुख्यमंत्र्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधले सुधीर मुनगंटीवार, मदन येरावार, परिणय फुके हे मंत्री यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. - अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे पती रवी राणा अपक्ष म्हणून बडनेरा मतदारसंघातून लढत आहेत. - विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा असून त्यासाठी 739 उमेदवार रिंगणात आहेत. - लोकसभा निवडणुकीत 50 विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेनं आघाडी घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात