जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यात मुसळधार पाऊस सुरूच; या जिल्ह्यात नदीला पूर, गावाचा संपर्क तुटला

राज्यात मुसळधार पाऊस सुरूच; या जिल्ह्यात नदीला पूर, गावाचा संपर्क तुटला

राज्यात मुसळधार पाऊस सुरूच; या जिल्ह्यात नदीला पूर, गावाचा संपर्क तुटला

यंदा काही दिवसांत झालेल्या दमदार पावसाने अनेक धरणं, नद्या 100 टक्के भरल्या आहेत. अशात आणखी 21 तारखेपर्यंत पावसाचा जोर कमी असेल असा इशार हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली, 19 ऑगस्ट : राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यंदा काही दिवसांत झालेल्या दमदार पावसाने अनेक धरणं, नद्या 100 टक्के भरल्या आहेत. अशात आणखी 21 तारखेपर्यंत पावसाचा जोर कमी असेल असा इशार हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नागपूर, सातारा, सांगली, गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक धरणं भरून वाहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. राञीपापसुन पडणाऱ्या मुसळधार पावसाने पर्लकोटा नदीला पुर आहे. हेमलकसा ते भामरागड दरम्यान असलेला पर्लकोटा नदीवरील मोठा पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातली शंभर गावं संपर्कहीन झाली आहेत. अशात जिल्हा अधिकारी आणि मदत कार्य गावापर्यंत पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर, काल सकाळी नदीतील पुर ओसरला होता. पण आज पुन्हा सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा पूर आला आहे. जिल्हयाच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातही काही भागात पावसाचा जोर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात