बुलडाणा - बकरी ईदच्या पार्श्वभूमी राज्यभर त्याची चर्चा सुरु आहे. आणखी एक चर्चा आहे ती बादशाह बोकडाची. विदर्भातल्या विवरा गावात हा बोकड आहे. त्याचा थाट पाहून आणि किंमत ऐकून सगळेच थक्क झाले आहेत.
विवरा गावातील त्या बादशाह बोकडाच्या डोक्यावर आहे चंद्रकोर, बकरी ईद निमित्य या बोकडासाठी मागणी वाढली असून मालकाने त्याचा भाव 10 लाख सांगितला आहे.
बुलडाणा जिल्यातील मलकापूर तालुक्यात विवरा या गावचा बादशाह नावाच्या बोकड असून जयराम ढोंन या व्यक्ती च्या घरी गेल्या 2 वर्षांपूर्वी बादशाह नावाच्या बोकड्याचा जन्म झाला. तेव्हापासून जयराम ढोन हे या बोकड्याचे पालनपोषण आपल्या मुलबाळ सारखे करत आहेत.
विशेष म्हणजे जन्मापासूनच या बोकडाच्या डोक्यावर चंद्रकोर असल्याचं निदर्शनास आले. त्यामुळे या बोकड्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. इतकंच काय तर बकरी ईद निमित्य कुर्बानीसाठी या बोकड्याला तब्बल 5 ते 6 लाखा रुपयापर्यंत मागणी होत आहे. मात्र जयराम यांना बादशहाची 9 ते 10 लाख रुपये किंमत मिळण्याची अपेक्षा आहे.
विवरा येथील या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरी दीड एकर शेती असून जोडधंदा म्हणून ते शेळीपालनही करतात. ढोन कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असतांना आपल्या मुला बाळासारखं वागवलेल्या या बोकड्याला आता विक्रीला काढलंय.
गावातल्या मंडळींनी या बोकडयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या बोकड्याला बाहेर गावांवरून चांगलीच मागणी येत आहे.