Home /News /maharashtra /

VIDEO : नागपूरच्या डॉक्टरांची कमाल, कोरोना रुग्णांसाठी बनवला इन्फेक्शन होऊ न देणारा बॉक्स

VIDEO : नागपूरच्या डॉक्टरांची कमाल, कोरोना रुग्णांसाठी बनवला इन्फेक्शन होऊ न देणारा बॉक्स

या यंत्रणेत रुग्णास एका पारदर्शक बंद बॉक्समध्ये ठेवल्या जाते. या उपकरणात ऑक्सिजन चा पुरवठा सतत सुरु असतो.

    नागपूर 03 एप्रिल: कोरोना रुग्णाला हाताळणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे आव्हान असते. अनेकदा ते जीवघेणेही ठरू शकते. या रुग्णांना अँब्युलन्स मधून नेणे, एका खाटेवरून दुसऱ्या खाटेवर, साध्या वॉर्ड मधून दुसऱ्या ICU वॉर्ड मध्ये,  X ray – CT scan - MRI सारख्या विशेष तपासण्यांसाठी नेणे, म्हणजे त्या संपूर्ण भागातच व्हायरस पोहोचण्याचा धोका असतो. डॉक्टर्स, नर्सेस, परिचारक, सफाई कामगार, ड्रायव्हरच नव्हे तर मार्गिकेतील प्रत्येक व्यक्ती -  या सगळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णास अशी वाहतूक यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयोग नागपूरच्या डॉक्टरांनी केलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वाहतूक यंत्रणेचं आज लोकार्पण झालं. ही यंत्रणा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आणि आजू बाजूच्या लोकांसाठी सुरक्षित असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. Aureus Institute of Medical Sciences  नागपूरच्या डॉक्टरांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने ही वाहतूक यंत्रणा बनविली आहे. अशा प्रकारची भारतातील हे पहिलेच Make in India – उत्पादन असल्याचा दावा करण्यात येतोय. या यंत्रणेत रुग्णास एका पारदर्शक बंद बॉक्समध्ये ठेवल्या जाते. या उपकरणात ऑक्सिजन चा पुरवठा सतत सुरु असतो. रुग्णाला काहीही त्रास होणार नाही अशी ही यंत्रणा आहे. रुग्ण बाहेरच्या लोकांशी बोलू शकतो. व्हेंटिलेटर असलेला रुग्णही या यंत्रणेतून सुरक्षित पणे नेता येतो. डॉ. अनंतसिंह राजपूत, डॉ. परीक्षित महाजन यांनी संशोधन करून आणि आपले स्वत:चे पैसे खर्च करून ही यंत्रणा बनली आहे. Key-Innovations चे डॉ. अमोल कडू यांनीही त्यांना सहकार्य केले. यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे उपस्थित होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Nagpur

    पुढील बातम्या