प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना म्हटलं नालायक, निवडणुकीदरम्यानच नवा वाद

प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना म्हटलं नालायक, निवडणुकीदरम्यानच नवा वाद

आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकर यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. भाजपला मतदान करणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे, असं वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबडेकर यांनी केलं आहे. आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं (बुधवारी) बोलताना सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. विधानसभेच्या निवडणुका आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवली. राज्यकर्ताच अप्रामाणिक असेल तर काय?' असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

बँका बुडण्यापासून वाचवायच्या असतील तर विरोधी पक्ष जिवंत असणं गरजेचं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांवर 420 चा गुन्हा झाला, काँग्रेच्या अनेक नेत्यांवर गुन्हे आहेत. पण कारवाई नाही. म्हणजे ह्यांच्या भानगडी आम्ही काढायच्या नाहीत, त्यांच्या भानगडी आम्ही काढत नाहीत असा समझोता झालाय का? असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

RSS बाबत गंभीर आरोप

'मागच्या आठवड्यात रेड्डी नावाच्या आर एस एस च्या प्रचारकाने पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आरोप करण्यात आला की, भारतामध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले त्यात माझा सहभाग होता. परंतु माध्यमांना ही बातमी महत्वाची वाटली नाही. जेवढे लोक करगीलच्या युद्धात शाहिद झाले नाहीत, पण त्यापेक्षा जास्त लोक या स्फोटात मारली गेली', असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 03:07 PM IST

ताज्या बातम्या