वाशिम, 19 एप्रिल : सोनखास येथील जवानाला अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. सहकारी जवानांना वाचवण्यासाठी अमोल गोरे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला. अमोल गोरे हे अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली परिसरात चीन सीमेवर गस्त घालत होते. दोन सहकारी जवानांना वाचवितांना 17 एप्रिल रोजी वीरमरण आलं. अरुण गोरे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी साडे नऊ वाजता वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात त्यांचं पार्थिव पोहोचणार आहे. वाशिम शहरातील डॉ आंबेडकर चौक,पाटणी चौक,शिवाजी चौक,लाखाळा मार्गे त्यांचं पार्थिव मुळं गावी सोनखास इथं नेण्यात येणार आहे. शाळेतून परतणाऱ्या 11 वर्षीय मुलीला कॅब चालकाने दिली लिफ्ट, नंतर केलं भयंकर कृत्य
घरी अंत्यदर्शन झाल्या नंतर गावातून अंत्ययात्रा निघेल. या अंत्ययात्रेत जिल्ह्यातील हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. शहिद अमोल गोरेवर त्यांच्या सोनखास या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अमोल गोरे हे 2010 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. अमोल गोरे यांच्या पश्चात पत्नी वैशाली, दोन मुलं,शेतकरी असलेले वडील तानाजी गोरे,आई,एक भाऊ आणि एक बहिण असा आप्त परिवार आहे.