राणा जगजितसिंह यांच्यामुळे उस्मानाबादमध्ये भाजप भोपळा फोडणार का?

राणा जगजितसिंह यांच्यामुळे उस्मानाबादमध्ये भाजप भोपळा फोडणार का?

उस्मानाबाद जिल्ह्यांतल्या 4 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात भाजपला विजय मिळाला नव्हता. पण आता मात्र भाजपने इथे संघटनात्मक ताकद वाढवली आहे. त्यामुळे भाजपला इथे चांगलं यश मिळू शकतं.

  • Share this:

बालाजी निरफळ

उस्नानाबाद, 16 सप्टेंबर : उस्मानाबाद जिल्ह्यांतल्या 4 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात भाजपला विजय मिळाला नव्हता. पण आता मात्र भाजपने इथे संघटनात्मक ताकद वाढवली आहे. त्यामुळे भाजपला इथे चांगलं यश मिळू शकतं.

उस्नानाबाद मतदारसंघात 2014 मध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला.

आता राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे उस्मानाबादमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. इतकी वर्षं स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीकडे होत्या. पण आता मात्र समीकरणं बदलली आहेत. युती झाली तर ती जागा भाजपला मिळू शकते.

परांडा मतदारसंघात सलग तीन वेळा राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांनी विजय मिळवला. त्यामुळे तेच इथे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. शिवसेनेकडून जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी तयारी चालवली आहे. गेल्या 2 वर्षांत त्यांनी इथे संघटनात्मक ताकद वाढवली आहे.

आईने दिलेल्या 'या' अमूल्य भेटीने गहिवरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

उमरगा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी इथून विजय मिळवलाय. त्यांच्याविरोधात सध्या काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नाही. काँग्रेसचे दिलीप भालेराव, भाजपचे कैलास शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे.

तुळजापूर मतदारसंघात काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांनी सलग चार वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे याही निवडणुकीत तेच काँग्रेसचे उमेदवार असतील. त्यांच्याविरोधात शिवसेनेतल्या इच्छुकांची संख्या मोठी आहे.

===================================================================================

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 05:21 PM IST

ताज्या बातम्या