जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भीषण! भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्यांना चिरडलं, अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO

भीषण! भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्यांना चिरडलं, अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO

भीषण! भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्यांना चिरडलं, अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO

परिसरात असलेल्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उल्हासनगर, 4 नोव्हेंबर : भरधाव ट्रक थेट पार्किंगमध्ये घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. उल्हासनगरच्या सतरा सेक्शन परिसरात मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्या परिसरात असलेल्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. ट्रक चालक बबन जाधव हा उल्हासनगर महापालिकेकडून सतरा सेक्शनकडे येत होता. यावेळी हा अपघात झाला. सतरा सेक्शन भागात रस्त्यालगत अनेक मोबाईलची दुकानं आहेत. इथे खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्याच्या शेजारी गाड्या पार्क करत असल्याने हा रस्ता अरुंद होतो. अनेकदा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक थेट पार्किंकमध्ये घुसला आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या लोकांना चिरडलं. यामध्ये तीन जण जखमी झाले असून अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढलं.

जाहिरात

दरम्यान. आजच्या अपघातात ट्रक चालक मद्यपान केलेला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ट्रक चालकाला मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, तर जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात