जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खेळता खेळता गायब झाला मुलगा आणि 7 दिवसांनंतर समोर आली धक्कादायक माहिती

खेळता खेळता गायब झाला मुलगा आणि 7 दिवसांनंतर समोर आली धक्कादायक माहिती

खेळता खेळता गायब झाला मुलगा आणि 7 दिवसांनंतर समोर आली धक्कादायक माहिती

कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र पोलिसांना 7 दिवस झाले तरी यशचा ठावठिकाणा लागत नव्हता.

  • -MIN READ
  • Last Updated :

उल्हासनगर, 27 डिसेंबर : झाकण नसलेल्या ड्रेनेजच्या उघड्या टाकीत पडून एका 8 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. मृत्यू झालेला मुलगा गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता होता. कॅम्प नंबर 2 च्या रमाबाई आंबेडकर नगर भागात राहणारा यश भुजंग हा 8 वर्षाचा मुलगा 21 डिसेंबर रोजी याच परिसरातील मैदानात खेळत होता. मात्र खेळता खेळता तो अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र पोलिसांना 7 दिवस झाले तरी यशचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर कॅम्प 2 परिसरात एका बंद कंपनीमध्ये ड्रेनेजच्या टाकीत मृतदेह असल्याची माहिती इथल्या स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनस्थळी जाऊन टाकीतून मृतदेह बाहेर काढीत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, या टाकीला झाकण नसल्याने ती तशीच उघडी होती. त्यात पडून या चिमुरड्याचा मृत्यू झाला असा अंदाज वर्तविला जात आहे. टाकीला झाकण असते तर यशचा मृत्यू झाला नसता असा आरोप यशच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवाय संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. यशचा मृत्यू ड्रेनेज टाकीत पडल्याने मृत्यू झाला आहे की त्याची हत्या करून मृतदेह टाकीत टाकला आहे हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात