राज्यातला पहिला तूर घोटाळा मराठवाड्यात उघड

राज्यातला पहिला तूर घोटाळा मराठवाड्यात उघड

शेगावमध्ये संचालकांनीच हा तूर घोटाळा केला आहे.

  • Share this:

01 मे : तूर खरेदीमध्ये मोठा घोटाळा उघड झाला आहे. शेगावमध्ये संचालकांनीच हा तूर घोटाळा केला आहे. सरकारने एकरी पाच क्विंटल तूर एका शेतकऱ्याकडून खरेदी करण्याचा आदेश दिला आहे. पण शेगावमध्ये नाफेडचे संचालक श्रीधर पांडुरंग पाटील यांनी 250 क्विंटल तूर विकली आहे. त्यांच्याकडे फक्त 10 एकर जमीन असताना त्यांनी 250 क्विंटल तूर विकली. तर जगदीश प्रेमसुख राठी यांनीही 250 क्विंटल तूर विकलीये. त्यांच्याकडेही 10 एकरच शेती आहे. मग येवढी तूर आली कुठून? एवढचं नाही तर ज्यांच्याकडे जमीन नाही अशांनीही तूर विकल्याच माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आलीये.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरूम बाजार समितीतही तूर खरेदीत घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. यासंबंधी मुरूम बाजार समितीला नोटीसही पाठवण्यात आलीय. डिसेंबर ते 18 मार्च या काळात 4 हजार 835 क्विंटल तूर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्याचं आढळून आलंय. विशेष म्हणजे सचिवांच्या लेखी सांगण्यावरून कमी दराने ही तूर खरेदी झाल्याचं उघड झालं आहे. तसंच 1 जानेवारी 2017ला परस्पर तूर लिलाव बंद करण्यात आले होते. या सगळ्या गैरप्रकाराबाबत  आयबीएन लोकमतने बातमी दाखवताच सरकारने या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान, तुर खरेदी प्रकरणात शेतकऱ्यांच्या नावे सरकारची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. यंदा राज्यात जलयुक्त शिवार योजना राबवल्याने तुरीचे विक्रमी २० लाख टन उत्पादन झाले. त्यापैकी पाच लाख टन तुर सरकारने खरेदी केली. पण शेतकऱ्यांच्या नावाने चांगभल करणाऱ्या व्यापाऱ्याना सोडणार नसल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

First published: May 1, 2017, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading