मुंबई, 25 मे: नायर हॉस्पिटलमध्ये आदिवासी समाजाच्या एका ट्रेनी डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. सिनियर ट्रेनी डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून डॉ.पायल तडवीनं नायर रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ती मूळची जळगावची असून 2 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलीस स्थानकात तीन सिनिअर डॉक्टर ट्रेनींविरोधात गुन्हा दाखल झाला. नायर रुग्णालयात ती ट्रेनिंग घेत असताना 3 वरिष्ठ ट्रेनी डॉक्टर तरुणीची वारंवार रॅगिंग करत होते. या मानसिक छळाची आणि अपमानास्पद वागणुकीविरोधात डॉ पायलच्या आईनं 10 तारखेला रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र 15 दिवसात प्रशासनानं काहीच केलं नाही. शेवटी सततची रॅगिंग सहन न झाल्यानं पायलनं आत्महत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.