मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /"आज संपत्ती अटॅच झालीय आणि उद्या प्रताप सरनाईकही अटॅच होतील" : भाजप नेते किरीट सोमय्या

"आज संपत्ती अटॅच झालीय आणि उद्या प्रताप सरनाईकही अटॅच होतील" : भाजप नेते किरीट सोमय्या

Shiv Sena MLA Pratap Sarnaik properties attached by ED: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत 11 कोटींहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

Shiv Sena MLA Pratap Sarnaik properties attached by ED: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत 11 कोटींहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

Shiv Sena MLA Pratap Sarnaik properties attached by ED: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत 11 कोटींहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 25 मार्च : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्याशी संबंधित मालमत्ता ईडीने जप्त केली असतानाच आता ईडीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांची ठाण्यातील संपत्ती ईडीने जप्त (ED attached properties of Pratap Sarnaik) केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत 11.35 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये ठाण्यातील फ्लॅट आणि मीरारोड येथील एका भूखंडाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने केलेल्या या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी एक मोठा दावा केला आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हटलं, 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात मी जनहित याचिका दाखल केली होती. 5600 कोटी रुपये नॅशनल स्पॉट एक्सचेंज घोटाळा झाला होता, कारवाई सुरू झाली. प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर आस्था बिल्डर या दोघांनी 5600 कोटी रुपयांपैकी 216 कोटींची चोरी केली. त्यापैकी 35 कोटी रुपये प्रताप सरनाईक यांच्या खात्यात आले. त्यातून त्यांनी टिटवाळ्यात 78 एकर जमीन घेतली. ती जमीन ईडीने अटॅच केली आहे आणि आता 2 फ्लॅट अटॅच केले आहेत. मला विश्वास आहे की, प्रताप सरनाईक यांनाही अटॅच म्हणजेच अटक होणार. एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांनी हा दावा केला आहे.

कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची NSEL घोटाळा प्रकरणात 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीला आपण पूर्ण सहकार्य केले आहे, माझ्याकडे 30 दिवसांची मुदत असून न्यायालयात दाद मागणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज ईडीने ठाण्यातील फ्लॅट आणि मीरा रोडमधील भूखंड जप्त केला आहे. 'ईडीकडून मला आठवड्याभरापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. तीस दिवसांच्या आतमध्ये मी अपील करणार आहे. न्यायालयाने जो निर्णय देईल तो मला मान्य राहणार आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

काय आहे प्रकरण?

ED ने 2013 च्या FIR क्रमांक 216 च्या आधारे 30.09.2013 रोजी आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी NSEL प्रकरणात त्याचे संचालक आणि NSEL चे प्रमुख अधिकारी NSEL चे 25 डिफॉल्टर आणि इतरांवर मनी लाँड्रिंग तपास सुरू केला होता. या प्रकरणात, आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला, त्यांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले आणि बोगस वेअरहाऊस पावत्यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केली, बनावट खाती तयार केली. खोटी केली. त्याद्वारे विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग केला. अंदाजे 13000 गुंतवणूकदारांचे 5600 कोटी पीएमएलए अंतर्गत केलेल्या तपासणीत असे दिसून आले की विविध गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे कर्जदार/एनएसईएलच्या व्यापारी सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकीत कर्जाची परतफेड आणि इतर ठिकाणी वळवले होते.

तपासात पुढे असे दिसून आले की, NSEL च्या डिफॉल्टर सदस्यांपैकी एक असलेल्या आस्था ग्रुपवर NSEL कडे 242.66 कोटी आहे. आस्था समूहाने रु. 2012-13 च्या कालावधीत मेसर्स विहंग आस्था गृहनिर्माण प्रकल्प एलएलपीचे 21.74 कोटी एकूण रक्कमेपैकी रु. 21.74 कोटी मेसर्स विहंग आस्था गृहनिर्माण प्रकल्प LLP कडून प्राप्त झाले. रुपये 11.35 कोटी मेसर्स विहंग एंटरप्रायझेस आणि मेसर्स विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड, दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली आहेत. मनी ट्रेल, छाननी आणि ओळखपत्राच्या आधारावर ठाणे, महाराष्ट्रातील 02 फ्लॅट्स आणि जमिनीच्या पार्सलसह प्रताप सरनाईक यांच्याकडे 11.35 कोटी रुपये PMLA, 2002 अंतर्गत 11.35 कोटी तात्पुरते जोडले गेले आहेत.

इतर उर्वरित रक्कम योगेश देशमुख याला आस्था ग्रुपकडून 10.50 कोटी रुपये दिले गेले. ही रक्कम 10.50 कोटी आधीच PMLA अंतर्गत संलग्न केले गेले आहेत आणि त्याची न्यायिक प्राधिकरणाने (PMLA) पुष्टी केली आहे. या प्रकरणात पूर्वीची मालमत्ता 3242.67 कोटी संलग्न करण्यात आली आहेत. या प्रकरणात एकूण संलग्न मालमत्तेचे मूल्य आता 3254.02 कोटी झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: ED, Kirit Somaiya, Mla pratap sarnaik, Shiv sena