मुंबई, 18 फेब्रुवारी : मुंबईच्या हवामान विभागानं (Mumbai Meteorological Department) राज्यातल्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यासाठी हवामान विभागानं संध्याकाळी एक अलर्ट (alert) जारी केलं आहे. त्यानुसार, आज संध्याकाळी राज्यातल्या 3 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊसाचा इशारा दिला आहे (Thunderstorm with lightning).
दरम्यान मुंबईतील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. विलेपार्ले, मालाड येथे पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 20 मिनिटांपासून पनवेल खारघर परिसरात पाऊस बरसत आहे. नवी मुंबईतदेखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाच्या मते, वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह माध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. संध्याकाळी 7 वाजेपासून पुढच्या 3 तासांसाठी हा अलर्ट (rain alert) आहे. कोल्हापूर, (Kolhapur) सांगली (Sangli) आणि सातारा (Satara) या पश्चिम महाराष्ट्रातील (West Maharashtra) 3 जिल्ह्यांसाठी हा अलर्ट आहे.
दरम्यान, हवामान विभागानं याआधीही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजानुसार, कालपासून राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय. आज संध्याकाळी पुणे जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.
Latest satellite image at 7 pm: Convective clouds developed over Madhya Mah, ghat areas including konkan, parts of marathwada & vidarbha too. Pune Drizzling now. Nashik Karad Satara Klp🌧🌩 reported. Nowcast:1900 hrs Dhule Pune A'Nagar TSRA Thane, Palghar Raigad next 3 hrs pic.twitter.com/bUg2dfsZPc
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 18, 2021
खेड,आंबेगाव तालुक्याच्या (Khed, Ambegaon) पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने झोडपले. भीमाशंकर परिसरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने बळीराजाची चिंता वाढली आहे.
हेही वाचामुंबईत कोरोना रुग्णांची वाढ होताच BMCचा मोठा निर्णय, 7 नवे नियम लागू
नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात द्राक्षांचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. द्राक्षांसोबतच (grapes) कांद्याच्या पिकालाही (Onion crop) फटका बसला.
चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणजेच तळकोकणपासून विदर्भापर्यंत अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, सातारा, सोलापूर, बीड, औरंगाबाद, परभणी, भंडारा, यवतमाळ, वाशिम, गोंदिया, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
19 फेब्रुवारीलाही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम आणि मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा पुणे वेधशाळेनं दिलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forcast, Weather warnings