कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाच्या स्वागतासाठी जंगी कार्यक्रम, लोकांच्या गर्दीने संकट वाढलं

औरंगाबादमधील या प्रकारामुळे कोरोनाचं संकट वाढलं आहे.

औरंगाबादमधील या प्रकारामुळे कोरोनाचं संकट वाढलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 7 जुलै : देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत भारतात संसर्ग झालेल्यांची संख्या सात लाखांच्या वर गेली आहे. देशातील सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे, जेथे कोविड – 19 मुळे संक्रमित झालेल्यांची संख्या 2 लाख 11 हजारांहून अधिक आहे. मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रातही बरीच संसर्ग होण्याची प्रकरणे समोर येत आहे. यामुळे औरंगाबादमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादच्या वैजापूर भागात कोरोना रूग्णाच्या स्वागतासाठी 100 हून अधिक लोक जमा झाले होते. या जमावाने सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही. सरकारने ठरविलेले नियमांचे पालन केले नाहीत. यावर  पोलीस निरीक्षक म्हणाले की, ज्या माणसाच्या स्वागताच्या सभोवतालचा परिसरातील लोक जमा झाले होते तो कंटेनमेंट झोन होता. हे वाचा-'राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत; त्यांनी डेमो पाहावा' कंपनीने दिलं प्रत्युत्तर असे असूनही, या व्यक्तीचे एकदा आंबेडकर चौकात आणि त्यांच्या घरी जोरदार स्वागत करण्यात आले. त्याच्या स्वागतासाठी जे जमले होते त्यांच्यात वैजापूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्षही आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथीच्या आजार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे वाचा-गोव्यातील डॉक्टरची माणुसकी; कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना 'जादूची झप्पी' 10-18 जुलैपासून कडक लॉकडाउन विशेष म्हणजे कोरोना विषाणूची वाढती घटना थांबविण्यासाठी 10 जुलैपासून कडक बंदी घालून महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केला जाईल. या टप्प्यातील लॉकडाऊन नऊ दिवसांचा असणार असून काही उद्योगांच्या कामकाजास हा लागू असेल, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली जाईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published: