औरंगाबाद, 6 ऑगस्ट : भांगसीमाता गडाजवळील डोंगरातील एक धक्कादायक घटना आज समोर आली आहे. तरुणी तिच्या मित्रांसोबत भांगसीमाता गडाजवळील डोंगरात फिरण्यासाठी गेली असता तिच्यावर 2 अज्ञातांनी बलात्कार केला होता. यातील एका आरोपीने आज खवड्या डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येचा लाइव्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणी तिच्या मित्रांसमोर फिरायला गेली होती. यावेळी काही अज्ञात तरुण तिथे आले आणि त्यांनी सगळ्यांना मारहाण करत मित्रांसमोरून उचलून नेत तरुणीवर बलात्कार केला. यावेळी तरुणीला देखील मारहाण करण्यात आल्याची माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली आहे. आरोपी नराधमांनी तरुणीला जवळच्या खड्ड्यात नेलं.
औरंगाबादमध्ये तरुणाने खवड्या कड्यावरुन मारली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा Live Video pic.twitter.com/uCc7IWqKEv
तेव्हा मुलगी मोठ्याने किंचाळत होती. गयावया करत हात जोडले. पण, नराधानाने तिचं काहीही न ऐकता तिच्यावर अत्याचार केले होते. यापैकी एका आरोपीचे नाव रावसाहेब माळी असे आहे. त्याने आज खवड्या कड्यावरुन उडी मारुन स्वत:ला संपवल्याची माहिती समोर आली आहे. याच्या आत्महत्येचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
रस्त्याच्या दिशेने काही जण मोबाइलमधून व्हिडीओ शूट करीत होते. काही सेकंदाच्या अंतराने अचानक तरुणाने डोंगरावरुन उडी घेतली. त्याचा व्हिडीओ समोर आल्याने मोठा धक्का बसला आहे. बलात्काराच्या घटनेनंतर या तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचललं. तो या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी होता.