ठाणे, 13 जुलै : वाघाची मावशी म्हणून प्रसिद्ध असलेलं मांजर हा अनेकांचा आवडता पाळीव प्राणी आहे. मांजर पाळायला, तिचे लाड करायला अनेकांना आवडतं. या मांजरप्रेमींनी नक्की भेट द्यावं असं एक कॅट गार्डन ठाण्यात आहे. फुलपाखरू गार्डन, चिमणी गार्डन हे तुम्हाला माहिती आहे. कॅट गार्डन नेमकं काय आहे? ते कसं सुरू झालं? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कशी झाली सुरूवात? तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्यात प्रत्येक तलावाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ठाणे महापालिकेसमोरच असलेल्या कचराळी तलावाचा परिसर आता कॅट गार्डन म्हणून ओळखला जाऊ लागलाय. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मांजरीचा सांभाळ करणे अवघड जात होते. त्यांनी घरातील मांजरी कचराळी तलावावर सोडल्या. त्यानंतर या तलावावर मांजरांची संख्या वाढू लागली. सध्या इथं 50 पेक्षा जास्त मांजरी आहेत.
कचराळी तलावावर आलेल्या मांजरी प्रेमळ असून त्या माणसाळलेल्या आहेत. इथं फिरायला येणारे ठाणेकर या माजरांना हात लावतात. त्यांचे लाड करतात. काही जण त्यांना खायलाही देतात. या मांजरांचे लसीकरण झाले असून नसबंदीही करण्यात आलीय, अशी माहिती कॅट फाऊंडेशनच्या सुशांत तोमर यांनी दिलीय. तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नसेल, असा साप आढळला पुण्यात, Video चिंता होतात दूर येथील मांजरी प्रेमळ आहेत. त्यांना कुरवाळताना, त्यांच्याबरोबर खेळताना खूप मजा येते. काही वेळासाठी तरी आमच्या चिंता दूर होतात, अशी भावना ठाणेकरांनी व्यक्त केली. . या सर्व मांजरीचे रंग देखील सुरेख आणि वेगवेगळे आहेत. वाघाची मावशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मांजरीचा येथे वावर असल्यानं कचराळी तलाव ठाणेकरांमध्ये कॅट गार्डन म्हणून ओळखला जाऊ लागलाय.