जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाज्यानंतर फुलांचे दरही वाढले, अधिक महिन्यात कोलमडलं सामान्यांचं बजेट

भाज्यानंतर फुलांचे दरही वाढले, अधिक महिन्यात कोलमडलं सामान्यांचं बजेट

भाज्यानंतर फुलांचे दरही वाढले, अधिक महिन्यात कोलमडलं सामान्यांचं बजेट

व्रतवैकल्यांचा अधिक महिना सुरू होताच फुलांचे दर वाढले आहेत. पाहा काय आहेत याची कारणं?

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

डोंबिवली , 26 जुलै 2023 :   उमललेली फुले पाहिली की मन प्रसन्न होते. कोणत्याही घरात आनंदाचा प्रसंग असो किंवा दुःखाचा प्रसंग फुलं विकत घेतली जातात. सध्या अधिकमास सुरू असून हा व्रत वैकल्याचा महिना आहे. या महिन्यात विष्णूयाग, विष्णूसहस्त्रनाम सारख्या पूजा सुरू आहेत. नेमक्या याच महिन्यात ठाणे जिल्ह्यात फुलांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडलीय. का वाढले फुलांचे भाव? मुंबई ठाणे परिसरात जुन्नर, नाशिक , नगर या भागांतून फुलांचा पुरवठा होतो. त्याचबरोबर बंगळूरु आणि गुजरातमधूनही फुले या बाजारात येतात. सुरुवातीला कडक उन्हाळा असल्याने फुलांचे नुकसान झाले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी सुखावले. या पावसाने कहर केलाय. गुजरात, कर्नाटकासह, महाराष्ट्रातील नगर , नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे फुलांचं नुकसान झालंय. त्यांची आवक कमी झालीय. गेल्या आठवड्यात 40 रुपये पाव किलो असणारी फुले आता बाजारात 80 रुपये पाव किलोने विकली जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कल्याण कृषी बाजार समितीमध्ये साधारण फुलांच्या 50 ते 60 गाड्यांचे आगमन होते. सध्या ही संख्या रोडावली असून फुलांनी भरलेले जेमतेम 40 लहान टेम्पो कल्याण कृषी बाजार समिती येथे दाखल झाले आहेत. तर केवळ दोन टेम्पो मोठे दाखल झाले आहेत. यामध्ये बाहेरचा एकही टेम्पो दाखल झालेला नाही. कृषी समितीमध्ये 120 रुपये किलो पर्यंत फुलांचे दर पोहचले आहेत. तुमच्याकडे असेल 1 एकर शेती, तर लावा ही 2 हजार झाडं, नंतर कमाईच कमाई PHOTOS जास्त पाऊस झाल्यानं फुलं खराब झाली होती. अनेकदा बाजारात आणलेली फुलं आम्हाला फेकून द्यावी लागतात. पाण्यानं भिजलेली असल्यानं फुलांची विक्री करता येत नाही, अशी माहिती फुलं विक्रेत्यांनी दिलीय. एकूणच अवकाळी पाऊस आणि निसर्गाची अवकृपा झाल्यानं भाज्यांच्या पाठोपाठ फुलांचे भावही वधारले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. श्रावण महिन्यात तरी फुलं स्वस्त होणार का? हा प्रश्न महिला विचारत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात