जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर अभिनेत्याने केला मोठा खुलासा Video

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर अभिनेत्याने केला मोठा खुलासा Video

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर अभिनेत्याने केला मोठा खुलासा Video

ज्येष्ठ कलाकार जयंत सावरकर यांच्या निधनानंतर अभिनेता मंगेश देसाईनं एक खुलासा केलाय.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे 25 जुलै : ज्येष्ठ कलाकार जयंत सावरकर यांचे सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरात निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी  ठाण्यातील  जवाहरबाग स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी, त्यांचे पार्थिव गडकरी रंगायतन येथे ठाणेकरांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांना अनेक कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अभिनेता सुबोध भावे, मंगेश देसाई, उदय सबनीस, सचिन गोस्वामी , अजय परचुरे, संदीप पाठक , अभिजित केळकर, संजय नार्वेकर यांनी त्यांना गडकरी रंगायतन येथे येऊन श्रद्धांजली अर्पण केली.

News18लोकमत
News18लोकमत

‘वडापाव निमित्त ठरला’ ‘अण्णा नेहमी फिट अँड फाईन होते. ते स्वतः च्या तब्येतीची नेहमी काळजी घेत. पण आपण जाणार असल्याची जाणीव त्यांना आधीच झाली होती,’ माहिती मंगेश देसाई यांनी दिली. त्यांनी एक वडा पाव खाल्ला होता. त्यांनतर त्यांची तब्येत बिघडली होती त्यांना जळजळ आणि छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला होता त्याचवेळी त्यांना कळले होते की माझी एक्झिट होणार आहे तसे त्यांनी आपल्या मुलाला देखील सांगितले होते अशी माहिती अभिनेते मंगेश देसाई यांनी दिली. ते तरुण कलाकारांचे देखील मित्रच होते असंही त्यांनी सांगितलं. दीपस्तंभ हरपला! ‘त्यांनी माझा सुरुवातीपासूनचा संघर्ष पाहिलाय. मला त्यांनी शिकवलंय. दीपस्तंभ या मालिकेत आम्ही 18 मिनिटांचा एक सीन वनशॉट मध्ये ओके केला होता. रंगकर्मी उभा राहतो तो केवळ रंगभूमीमुळे. रंगभूमीशी एकनिष्ठ राहिली की ती आपल्याला प्रेम देतेच असे ते सांगत. मराठी रंगभूमीचा विनम्र सेवक जयंत सावरकर असे ते कायम फोन आल्यानंतर म्हणायचे. अण्णा गेल्याने एक पोकळी निर्माण झालीय,’ या शब्दात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. वय वर्षे 88 तरी नव्हतं कसंलच दुखणं, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवंगत अभिनेते जयंत सावरकर नक्की करायचे तरी काय? ‘अण्णा कुठेही शूटिंग असेल तर लोकलनेच प्रवास करून येत. ते मनाने, शरीराने आणि कामाने कायम तरुण होते. कुठल्याही काळातील कलाकारांना बरोबर घेऊन ते काम करत असे. रंगभूमीची सरी स्थिंत्यतरे त्यांनी पाहिली होती. त्यांना चिरशांती लाभावी,’ अशा भावना अभिनेता सुबोध भावे याने व्यक्त केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात