डोंबिवली, 5 जुलै : ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे. या कॅन्सरची लक्षणं सुरूवातीलाच दिसू लागतात. त्यानंतर तातडीनं डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. ही लक्षणं नेमकी कोणती याबाबत डोंबिवलीच्या अनिल हॉस्पिटलमधील कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. अनिल हेरूर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ब्रेस्ट कॅन्सरची 5 लक्षणं कोणती? -घरात आई, आजी, मावशी यापैकी कोणाला स्तन, अंडाशय , गर्भाशय , आतड्याचा कर्करोग झाला असेल तर आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. -स्तनाला गाठ आली असेल तर दुर्लक्ष करू नका. ही गाठ दुखणारी नसते. -स्तनातून रक्तस्राव होणे किंवा काळ्या रंगाचा स्त्राव बाहेर पडणे. -स्तनावरील त्वचा लाल होते. दडदडीत होते. संत्र्याच्या सालीसारखी दिसते. - छाती जड झाल्यासारखी वाटू लागते. काय काळजी घ्यावी? महिलांनी ब्रेस्ट कॅन्सरबाबत सावध राहणे आवश्यक असून त्यांनी सुरुवातीला स्वत:ची तपासणी स्वत: करावी, असं डॉ. हेरुर यांनी सांगितलं. ’ तळहाताने ही तपासणी करावी. स्तनाच्या वर खाली, डावीकडे आणि उजवीकडे दाबून बघावे. त्यानंतर निपल्सला दाबून बघावे. त्यातून कोणता स्त्राव येत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवणे गरजेचं आहे,’ असं हेरूर यांनी सांगितलं. घशात सारखा कफ राहतोय? वेळीच सावध व्हा, लगेच डॅाक्टरांशी करा संपर्क भारतात वर्षाला 15 लाख ते 17 लाख महिलांना स्तनांचा कर्करोग होतो. असल्याची त्यामुळे यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीनं डॉक्टरांकडं जावं. वेळीच डॉक्टरांकडं गेल्यानंतर या आजारावर मात करता येते, त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असं हेरूर यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.