ठाणे, 03 मार्च : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सकाळी व्यायामासाठी फिरताना 4 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. दरम्यान त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना दुसरी एक घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हानगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मनसे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मनसेच्या पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली आहे. मनसे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. देशमुख यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचा योगीराज देशमुख पाठपुरावा करत होते.
संजय राऊत यांच्यावर शरद पवार नाराज, उद्धव ठाकरेंसमोरच बोलून दाखवलंमनसे नेते संदीप देशपांडेंवर ही हल्ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. पण, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी करा अशी मागणी मनसेचे नेते अमय खोपकर यांनी केली आहे.
आज सकाळी शिवाजी पार्कमध्ये अज्ञात लोकांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली. तर हा हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात संदीप देशपांडे यांच्या हाताला जबर मार लागला. या हल्ल्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या हल्ल्यामागे कोण आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
संदीप देशपांडेंना अखेर डिस्चार्ज, राज ठाकरे स्वत: गेले शिलेदाराला घ्यायला!या हल्ल्या प्रकरणी मला १०० टक्के खात्री आहे की हा हल्ला संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी केला आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या गुंडांनी हा भ्याड हल्ला केला आहे. रोज स्वत:ला मर्द मर्द म्हणतात आणि भ्याड हल्ला करतात, अशी टीका अमेय खोपकर यांनी केली.