शिवाजी गोरे, प्रतिनिधी
तळीये, 27 जुलै: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील (Mahad, Raigad) तळीये गावात (Taliye Village) घडलेल्या दुर्घटनेतून एका हिरकणीने चक्क आपल्या तीन मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल (Mother saves her three children's) आहे. या हिरकणीचे नाव शेवंता नंदू कोंडाळकर (Shevanta Nandu Kondalkar) आहे. या दुर्दैवी घटनेची ती प्रत्यक्ष साक्षीदार आहे. या डोंगराचा भाग अनेक कुटुंबियांसाठी काळ बनून आला होता, परंतु यातून मोठ्या हिमतीने तिने आपला जीव वाचवला त्याच बरोबर आपल्या तीन मुलांना तिने अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेतून एकदा नव्हे तर चार वेळा तिच्या मुलांवर दरडीचा काही भाग आला होता. परंतु त्या माऊलीने आपल्या जीवाची परवा न करता तिने चक्क दोन मुली आणि 1 मुलगा असे तिघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. अचानक डोंगर खचला क्षणार्धात हा डोंगर पूर्णपणे वाडीतील घरावर कोसळला जो-तो जीव वाचवण्यासाठी सैरभैर झाला होता. परंतु तो काळ खूप भयानक होता. चिखल, माती, दगड बरोबर सर्वकाही वाहून गेले.
रायगडमधील दरड कोसळतानाचा LIVE VIDEO
आपल्या मुलांचा हात हातातून सुटून नये यासाठी शेवंता नावाच्या हिरकणीने आपल्या मुलांचे कपडे पकडून ओढत खेचले आणि दलदलीतून बाहेर काढले. परंतु मुलांना डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता. त्यांचे मित्र आजूबाजूचे नातेवाईक सगळेच लोक या दलदलीत फसले होते. जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होते. परंतु त्यांच्या मदतीला धावून जाण्यास कोणीही धजावत नव्हते.
निसर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात खोकला होता आणि निसर्गापुढे माणूस हतबल झाला होता परंतु त्याही प्रसंगातुन आपल्या प्राण गेला तरी चालेल परंतु माझे मुलं वाचले पाहिजेत या हिमतीने शेवंता कोंडाळकर यांनी आपल्या तीन मुलांचा जीव वाचवला. अक्षरश: कंबरभर चिखलातून तिने वाट काढली, चारच्या सुमारास डोंगर कोसळला हा सगळा प्रसंग डोळ्यासमोर दिसत होता. काहीजण वाचवण्यासाठी दया याचना करत होते, परंतु त्यांना वाचवणे शक्य झाले नाही ही खंत आपल्या मनात असल्याचं त्याने बोलून दाखवला आहे. मी माझ्या मुलांना दिलेला शब्द पाळला परंतु इतर आमचे नातेवाईक सहकारी या दुर्दैवी घटनेत आपल्या डोळ्यासमोर गतप्राण झाल्याचे शल्य त्यांच्या मनामध्ये कायम आहे. त्यांनी काजल कोंढाळकर, अक्षता कोंढाळकर आणि परम कोंढाळकर या तिन्ही मुलांचे प्राण वाचवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raigad, Rain flood