मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हलाखीच्या परिस्थितीला आत्मविश्वासाने दिला लढा, विद्यार्थिनीने मिळवले 100 टक्के गुण

हलाखीच्या परिस्थितीला आत्मविश्वासाने दिला लढा, विद्यार्थिनीने मिळवले 100 टक्के गुण

विजय देशमुख हे मोताळा शहरात एक छोटसं किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

विजय देशमुख हे मोताळा शहरात एक छोटसं किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

विजय देशमुख हे मोताळा शहरात एक छोटसं किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

बुलडाणा, 30 जुलै : यश संपादन करण्यासाठी कौटुंबिक परिस्थितीची नाही तर जिद्द..चिकाटी..आणि आत्मविश्वासाची गरज असते हे बुलडाणा जिल्ह्यातील चंचल विजय देशमुख या विद्यार्थिनीने दाखवून दिलं आहे. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये चंचल हिने दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

चंचलचे वडील विजय देशमुख हे मोताळा शहरात एक छोटसं किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर आई गृहिणी आहे. चंचलची परिस्थिती एकदम हलाखीची असून मोताळा येथे घर सोडले तर काहीच स्थावर मालमत्ता नाही. काम केले तरंच घरचा उदरनिर्वाह चालतो.

चंचलच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ती शाळेतून घरी गेल्यावर आईला घर कामात मदत करत असे. मात्र अशा स्थितीतही तिने दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवित विद्यालयाचा आणि गावाचा नावलौकिक वाढविले आहे. चंचलने अभ्यासात अथक परिश्रम घेऊन आकाशाला गवसनी घालण्याचे नेत्रदीप काम केले आहे. तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, यंदाचा निकाल मागच्या 15 वर्षातला सर्वात उत्तम निकाल असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं. राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला असून कोकण विभाग अव्वल आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा 3 टक्के जास्त विद्यार्थिनींचा निकाल लागला आहे.

विशेष बाब म्हणजे 15 लाख विद्यार्थ्यांमधून 242 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. राज्यातील 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्यात 60 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती बोर्डानं दिली.

First published: