मुंबई, 28 ऑगस्ट : महाऱाष्ट्र एसएससी बोर्डाच्या फेरपरीक्षेचा निकाल 28 ऑगस्टला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बोर्डाकडून याबाबत काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळं विद्यार्थांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या http://mahresult.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. बोर्डानं 17 ते 30 जुलै या कालावधीत फेरपरीक्षा घेतली होती. तर मुख्य परीक्षेचा निकाल 8 जुन रोजी जाहीर करण्यात आला होता. 23 ऑगस्टला बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लावल्यानंतर दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. फेरपरीक्षेचा निकाल आल्यानंतर विद्यार्थांना त्यांचे पुनर्मुल्यांकन करता येईल. तसेच विद्यार्थांना पुढील शैक्षणिक प्रवेशही घेता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना बैठक क्रमांक आणि आईचे नाव लागेल. या दोन्हींशिवाय निकाल पाहता येणार नाही. राज्यात दहावीचा निकाल 77.10 टक्के इतका लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णांची संख्या 12.31 टक्क्यांनी कमी आहे. यावेळीही मुलींनीच बाजी मारली. तर विभागामाध्ये कोकण पुन्हा पहिल्या स्थानीच राहिले. कोकणचा निकाल 88.38 टक्के इतका तर सर्वात कमी 67.27 टक्के नागपूरचा निकाल लागला. बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







