मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अधिवेशनाआधी कोरोनाच्या टार्गेटवर मंत्री, विधान परिषदेच्या सभापतींनी मुख्यमंत्र्यांकडे केली महत्त्वाची मागणी

अधिवेशनाआधी कोरोनाच्या टार्गेटवर मंत्री, विधान परिषदेच्या सभापतींनी मुख्यमंत्र्यांकडे केली महत्त्वाची मागणी

अनेक लोकप्रतिनिधींना कोरोना लागण झाल्याचे समोर येत आहे.

अनेक लोकप्रतिनिधींना कोरोना लागण झाल्याचे समोर येत आहे.

अनेक लोकप्रतिनिधींना कोरोना लागण झाल्याचे समोर येत आहे.

मुंबई, 19 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राज्यातील 4 पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. साधारण तीन आठवड्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन मार्चमध्ये होत आहे. हे अधिवेशन नेमके किती कालावधीत घ्यायचे यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय मतभेद होत आहेत. त्यातच अनेक लोकप्रतिनिधींना कोरोना लागण झाल्याचे समोर येत आहे.

मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अधिवेशनाचा कालावधी सुरू होण्याआधीच अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होत असल्याने महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे.

देशात आणि राज्यात कोरोना लसीकरण सुरू असताना त्यात आरोग्य क्षेत्रातील लोक तसंच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी यांना सध्या ही लस दिली जात आहे. अधिवेशनाच्या आधी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री यांना संबंधित लस देण्यात यावी अशी मागणी निंबाळकर हे सरकारला करणार आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, आकडा 6 हजारांच्या पार; रिकव्हरी रेटही घसरला!

लोकप्रतिनिधी सार्वजनिक कार्यक्रमात तसेच इतर शासकीय कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात. तेव्हा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अशातच याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांना लसीकरण केलं तर फायदा होईल, असा एक मतप्रवाह आहे. त्याच भूमिकेतून सभापती निंबाळकर यांनी अशा स्वरूपाची मागणी केल्याचं म्हटलं जाते.

लसीकरण राज्यात सर्वत्र जोरदार सुरू आहे. त्याला लोकांचा प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. लसीकरणामध्ये पुढील कालावधीमध्ये वरिष्ठ नागरिक यांचादेखील समावेश केला जाईल असे संकेत यापूर्वीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. आता नव्याने कोणत्या गटाचा लसीकरणामध्ये समाविष्ट करायचा असेल तर केंद्र सरकारची परवानगी आवश्यक राहणार आहे. त्यानुसार कदाचित राज्य सरकारदेखील केंद्र सरकारबरोबर पत्रव्यवहार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Ramraje nimbalkar