अनुराग सुतकर**, प्रतिनिधी** सोलापूर 10 जून : आषाढी यात्रेचे औचित्य साधून दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून दहा ते पंधरा लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. त्यामध्ये महिलांचेही प्रमाण तितकेच असते. दरवर्षी फिरते शौचालय, पाण्याची सोयीसुविधा याचे नियोजन आखलेले असते. परंतु, सर्व पालख्या सोलापूर जिल्ह्यात येत असतात तसे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये विशेष करून वयोवृद्ध महिला तसेच लहान मुली यांच्याकरिता पाण्याचा आणि एकंदरीत स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे यंदाच्या वेळी खास महिलांसाठी विशेष असे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात आले आहे. स्थानिकांनी करावी मदत पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांनी सुद्धा महिला वारकऱ्यांसाठी स्थानिक पातळीवर विशेष उपाययोजना करून यांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत. रात्री विश्रांतीची वेळ सोडता इतर वेळी स्वतः वारकरी हे सर्व गोष्टींनी सक्षम असतात. त्यामुळे स्थानिकांनी वारकऱ्यांची रात्री विश्रांतीची सोय करावी, अशी मागणी वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
महिला वारकऱ्यांसाठी खास नियोजन यंदाच्या वर्षी महिलांसाठी विशेष शौचालय आणि स्नानगृह असणार आहेत. तसेच अनेक महिलांसाठी स्तनपानासाठी हिरकणी कक्ष देखील असणार आहेत. पालखीचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी या दोन्ही सुविधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरवर्षी सॅनिटरी पॅडचा मोठा अभाव असतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी ठिकठिकाणी वेंडर मशीन लावून सॅनिटरी पॅड मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिला डॉक्टरांची नियुक्ती महिला वारकऱ्यांसाठी यंदाच्या वर्षी खास महिला डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. शारीरिक समस्येच्या बाबतीत कोणतेही महिला वारकऱ्यांना अडचण आली तर ते त्या डॉक्टरांशी हितगुज साधू शकतात. या सर्व गोष्टी सोडून महिलांचे संरक्षण आणि त्यांची जबाबदारी यासाठी विशेष ट्रेनिंग झालेल्या अनेक महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक, पाहा Video महिला वारकऱ्यांची काळजी घेणं आमचं कर्तव्य वारी संदर्भात झालेल्या अनेक प्रशासकीय बैठकांच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी महिला वारकऱ्यांसाठी विशेष सोयीसुविधांची अनेक पथके नेमण्याकडे आम्ही सर्वांनी प्रशासकीय पातळीवर विशेष लक्ष दिले आहे. कारण वारीमध्ये पुरुषांबरोबरच महिलांची संख्या अधिक असते. त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे आमचे प्रशासकीय कर्तव्य आहे, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलंय.