प्रितम पंडीत (सोलापूर), 28 ऑक्टोबर : सोलापूर जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरफोड्या, चेन स्नॅचींग, यासारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान सोलापूर बसस्थानकामध्ये महिलांचे सोने चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ झाल्याने सोलापूर बसस्थानक चर्चेत आले होते. यावरून पोलिसांनी जाळे लावत एका महिलेला पकडले आहे. त्या महिलेने कित्येकांचे सोने चोरल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पोलिसांनी बस स्थानकावर महिला प्रवाशांचे सोने लुटणाऱ्या महिलेस अटक केली आहे. हाताला काम नाही कुठे रोजगार मिळत नसल्याच्या कारणावरून त्या महिलेने चोरी केल्याची प्राथमिक माहिती हाती लागली आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे गरीबीतून चोरीचा धंदा सुरू केला असल्याचे तिने कबूल केले आहे. कमी वेळेत जास्त पैसा मिळू लागल्याने चोरी करत असल्याचेही त्या महिलेने कबूल केले आहे. चोरीचे सोने विकताना ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
हे ही वाचा : लग्नापासूनच छळ, नंतर म्हणाला संन्यास घ्यायचाय घटस्फोट दे; सोलापुरात महिलेसोबत धक्कादायक प्रकार
आयेशा युसूफ शेख असं ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस चौकशीनंतर त्या महिलेने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी तिच्याकडून एकूण साडेबारा तोळे वजनाचे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आयेशा शेख हीने गरीब परिस्थितीमुळे चोरीच्या धंदा चालू केला. तिला एकूण सहा अपत्य आहेत आणि त्यांची सारी जबाबदारी तिच्यावर आहे. ती बुरखा घालून बसमध्ये चढण्याचे नाटक करायची आणि गर्दीचा फायदा उचलून महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारायची. सोलापूर पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मागे होते. दरम्यना पोलिसांना अखेर यश आले आहे.
सोलापूर रेल्वे स्थानकावर महिलेचा धिंगाणा
सोलापूर रेल्वे स्टेशनवर एका तरुणाीने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एसी वेटिंग रुमच्या खिडक्यांची तोडफोड केली आहे. ही संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा : सोलापुरात 28 वर्ष तरुण वडे तळताना अचानक कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने…Video
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर रेल्वे स्टेशनवर आज सकाळी ही घटना घडली. या तरुणीने रेल्वे स्टेशनवरील AC वेटिंग रूमच्या खिडक्यांची तोडफोड केली. या तरुणी रागाच्या भरात स्टेशनवर लोखंडी वस्तूने तोडफोड केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.