अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 16 जून : सोलापूरमधील वृद्ध दांपत्याच्या घरी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. वृद्ध दांपत्याच्या घरातील चोरीस गेलेले 36 तोळे सोने आणि 25 तोळे चांदी असा एकूण 17 लाख 92 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. ही चोरी वृद्ध दांपत्याच्या घरी नियमित येणाऱ्या व्यक्तीनेच केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, टिळक चौक येथे राहणारे तारा चंडक आणि गिरीश चंडक हे वृद्ध दांपत्य वास्त्यव्यास आहेत. तारा यांचे दोन्ही मुले कामानिमित्त बाहेरगावी राहतात. तारा चंडक यांनी त्यांच्या तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने हे मार्च 2021 मध्ये पाहिले होते. परंतु नंतर ते सोने तिथे दिसून आले नाही. 2023 मध्ये त्यांनी त्यांच्या तिजोरीत हे दागिने आहेत का नाहीत ते पाहिले असता 36 तोळे सोने आणि 25 तोळे चांदी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. लागलीच पोलिसांची मदत घेत त्यांनी 13 जून रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.
पुढे तपासाला सुरुवात झाली असता घरातील काम करणाऱ्या मोलकरीण महिला यांना विचारणा केली असता कुणीच गुन्ह्याची कबुली दिली नाही. शिवाय तिजोरीचे लॉक हे तुटलेले नसून कोणीतरी डुप्लिकेट चावी बनवून चोरी केला असल्याचे संशय पोलिसांना होता. पोलिसांनी चंडक कुटुंबीयांच्या संपर्कात असणारा सर्व व्यक्तींचे गुप्तहेरच्या मार्फत चौकशी केली.
Crime News : व्हिडीओ कॉलवर एक एक कपडे उतरवत होती तरुणी; तरुणाची ‘अक्कल बंद’, आणि पुढे…
यामध्ये चंडक यांच्या घरी नियमित येणारा आणि वृत्तपत्र टाकण्याच्या लाईनमध्ये काम करणाऱ्या श्रीनिवास पगडीमाल यानेच चोरी केली असल्याचा संशय पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना आला. लागलीच त्यांनी त्याची चौकशी केली असता तो जुना पुना नाका येथे हायवे वरून खाजगी वाहनाने पुण्याला पळून जात असल्याचे समजले. संपूर्ण सापळा रचून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता 36 तोळे सोने 25 तोळे चांदी असा एकूण 17 लाख 92 हजार पाचशे रुपयांचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.