जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / देवालाच फसवलं! व्यवस्थापकही चक्रावले, पंढरपूर मंदिरातला धक्कादायक प्रकार

देवालाच फसवलं! व्यवस्थापकही चक्रावले, पंढरपूर मंदिरातला धक्कादायक प्रकार

देवालाच फसवलं! व्यवस्थापकही चक्रावले, पंढरपूर मंदिरातला धक्कादायक प्रकार

मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटातील देवाला सोन्याची टोपी देण्याचा प्रसंग आठवत असेल, अगदी तसाच काहीसा प्रकार पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दान केलेल्या दगिन्यांबाबत घडला आहे.

  • -MIN READ Pandharpur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

पंढरपूर, 5 जानेवारी : मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटातील देवाला सोन्याची टोपी देण्याचा प्रसंग आठवत असेल, अगदी तसाच काहीसा प्रकार पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दान केलेल्या दगिन्यांबाबत घडला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्ष भरात लाखो भाविक येत असतात. अनेक जण आपले नवस पूर्ण झाल्याच्या भावनेने रोख रक्कम, सोन्याचे , चांदीचे दागिने दान करत असतात. देवाची दान पेटी मोजताना यात अनेक प्रकारचे दागिने आढळतात. या दागिन्यांना सराफा कडून खरे आहेत का? तपासले जाते. खरे असणारे दागिने व्यवस्थीत ठेवले जातात. यात अनेक दागिने सोन्या-चांदी सारखे दिसणारे, पण त्याला पॉलिश केलेले किंवा बेंटेक्स प्रकारचे आढळले आहेत. अशा नकली दागिन्यांची संख्या एक पोते भरेल इतकी झाली आहे. भाविकांनी श्रद्धेने देवाला काय अर्पण करावे? हा त्यांच्या भावनेचा विषय आहे. पण सोने समजून दुसरी नकली वस्तू कोणी विक्री करत असेल तर भाविकांनी काळजी घ्यावी किंवा पावती घ्यावी जेणे करून फसवणूक होणार नाही, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले आहे. ‘आपली श्रद्धा असते, श्रद्धेपोटी आपण काहीही दान करू शकता. पण सोन्याचे दागिने घेतले असतील तर रितसर पावती घ्यावी, ते व्यवस्थित आहेत का ते बघावं, नंतर आमच्याकडे दान करावं. श्रद्धेपोटी काहीही दान केलं तरी पांडुरंग त्याला नाही म्हणणार नाही, पण स्वत:ची फसवणूक होणार नाही, याची काळजी भाविकांनी घ्यावी,’ असं आवाहन मंदिराच्या व्यवस्थापनाने केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात