अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 1 मे : दुष्काळी जिल्हा अशीच सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांचा उच्च शिक्षणाकडे कल असतो. तसेच स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नातही अनेकजण असतात. नुकतेच महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये बार्शीतील प्रशांत बाळासाहेब डांगे यानं मोठं यश मिळवलं आहे. वन अधिकारी (RFO) परीक्षेत प्रशांत राज्यात अव्वला आला आहे. कष्टानं मिळवलं यश प्रशांत डांगे याचं मूळ गाव बार्शी आहे. वडील सेक्शनल इंजिनिअर असल्याने घरात शैक्षणिक वातावरण आहे. तर प्रशांतची आई गृहिणी आहे. बार्शीतील सुलाखे हायस्कुलमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर एमआयटी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तर पुण्यातच इंजिनिअरिंगची पदवी घेतली. याच काळात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली आणि अगदी कष्टाने यश मिळवले.
जॉब की नोकरी द्विधा मनस्थितीतून मार्ग कोरोना महामारीच्या काळात द्विधा मनस्थितीत होतो. जॉब करावा की अभ्यास कायम ठेवावा असा प्रश्न होता. तरीही अभ्यास सुरूच ठेवला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पाहून प्रश्नसंच सोडवत अभ्यास केला. तसेच संदर्भ ग्रंथांचे वाचन केले. परीक्षेचे योग्य नियोजन केल्यानेच हे यश मिळाले, असे प्रशांत सांगतात. MPSC RFO Exam : शेतमजूर आईच्या कष्टाचे मुलानं फेडले पांग, पहिल्याच प्रयत्नात अक्षय राज्यात प्रथम, Video संवेदनशील अधिकारी म्हणून काम करायचंय अगदी कष्टाने हे यश संपादित केले असून येत्या काळात एक संवेदनशील अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहे. तसेच प्रशासनात नवीन कल्पना आणि उपक्रम राबवण्याची इच्छा आहे, असे प्रशांत सांगतात. या सर्व प्रवासात आई-वडील, भाऊ आणि मित्र यांची सतत प्रेरणा लाभली. तसेच अनेकांनी योग्य मार्गदर्शन केल्यानेच हे यश मिळवता आले, असेही प्रशांत डांगे यांनी सांगितले.