पंढरपूर, 25 जून : लोकसभेच्या निवडणुका आता अवघ्या 9 ते 10 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, तर विधानसभा निवडणुकींनाही फक्त सव्वा वर्ष शिल्लक आहे, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाने महाराष्ट्रामध्ये एण्ट्री घेतली आहे. बीआरएसमध्ये मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या नेत्यांचे पक्ष प्रवेश होत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भागिरथ भालके हेदेखील बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. बीआरएसच्या वाटेवर असलेल्या भागिरथ भालके यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वडिलकीचा सल्ला दिला आहे. जेव्हा अडचणीत असशील तेव्हा माझी आठवण काढ, असं म्हणत पटोलेंनी भालकेंना भावनिक साद घातली आहे. भालकेंच्या बीआरएस प्रवेशाबद्दल सध्या पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत, त्यामुळे त्यांनी चुकीच्या वाटेने जाऊ नये, अशी इच्छा असल्याचं पटोले म्हणाले. शिवाय भालकेंना काँग्रेसच योग्य वाट दाखवू शकते, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. मुख्यमंत्रिपदाची ऑफर, पण पंकजा मुंडे भाजप सोडणार का? खडसेंनी सांगितली Inside Story ‘भागिरथचे वडील माझे चांगले मित्र होते, त्यामुळे मी मागेही त्यांना सांगितलं होतं की तू त्रासात असशील तेव्हा माझी आठवण काढ. तूला चांगला मार्ग मी निश्चितपणे देईन. त्यांना आम्ही बसवून सगळं समजवून सांगितलं होतं. ते कोणत्या कारणामुळे जात आहेत, याची चर्चा पंढरपूरमध्ये होत आहे. पण तो चुकीच्या मार्गाने जाऊ नये, त्याला काँग्रेसच मार्ग देऊ शकतं,’ असं नाना पटोले म्हणाले आहेत. काय म्हणाले भागिरथ भालके? ‘शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत, बहुजन समाजाच्या बाबतीत जो पक्ष काम करत आहे, त्या बीआरएस पक्षाचे प्रमुख तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत आपण जाऊया, हा जनादेश सगळ्यांनी बोलून दाखवला. या जनादेशाचा आदर करून मी केसीआर यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएसमध्ये प्रवेश करतो आहे’, अशी प्रतिक्रिया भागिरथ भालके यांनी दिली आहे. मी खडसेंना चहाचं आमंत्रण दिलंय; त्या प्रसंगानंतर गुलाबराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.