सोलापूर 20 डिसेंबर : सोलापूरमध्ये नुकतीच अंध मुलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा झाली. कोरेगाव पार्क अंधशाळा पुणे आणि तारामती बाफना अंधशाळा औरंगाबाद यांच्यामध्ये चुरशीच्या झालेल्या फायनलमध्ये औरंगाबादच्या टीमनं विजेतेपद पटकावलं. सामान्य क्रिकेट स्पर्धांच्या तुलनेत अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत नियम वेगळे असतात. अंधांच्या क्रिकेटमधील प्रमुख वैशिष्ट्य जाणून घेऊ या प्रमुख नियम -दोन्हीही टीममध्ये नॉर्मल क्रिकेट प्रमाणे 11- 11 खेळाडू असतात. - टीमच्या अकरा गटातील खेळाडूंची तीन गटात विभागणी केलेली असते. - जे खेळाडू बी-१ गटात म्हणजेच ज्यांना काहीच दिसत नाही असे खेळाडू या गटात असतात. एकूण 4 खेळाडूंचा या गटात समावेश असतो. - बी-२ गटात म्हणजेच ज्यांना लो व्हिजन आहे असे तीन खेळाडू असतात - बी-३ गटात म्हणजेच ज्यांचा एक डोळा अंध आहे किंवा ज्यांना बऱ्यापैकी दिसू शकते अशा खेळाडूंची समावेश असतो. या प्रकारतील 4 खेळाडू टीममध्ये असतात. - बॉलरला हाफपीच आणि अंडरआर्म बॉलिंग करावी लागते. - बी-1 गटातील व्यक्तीने एक रन काढला तर त्याला दोन रन दिले जातात. तिरस्कार करणारी लोकं आता… साक्षी मलिकनं सांगितला ‘तो’ अनुभव, Video क्रिकेटची वैशिष्ट्ये काय? - अंधांच्या क्रिकेटमध्ये प्लॅस्टिकचा बॉल वापरला जातो आणि त्यामध्ये बेरिंग्स असतात - हा बॉल फेकल्यानंतर बेरिंग आणि प्लॅस्टिक यांचा संपर्क येऊन विशिष्ट खुळखुळ्याप्रमाणे आवाज निघतो. त्या आवाजाचा अंदाज घेत बॅटर बॅटिंग करतो, आणि त्याच आवाजाचा अंदाज घेत फिल्डर फिल्डिंग करतो. - अंधांची श्रवण शक्ती ही जास्त असते, असं मानलं जातं. याच श्रवण शक्तीचा वापर करुन हे खेळाडू क्रिकेट खेळतात. मेस्सी साहेबांनी वर्ल्ड कप जिंकला, फुटबॉलवेड्या कोल्हापुरात एकच जल्लोष… Video कसा होतो खेळाडूंचा सराव? औरंगाबाद टीमचे प्रशिक्षक मनोज पाटील यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ’ सुरुवातीला खेळाडूंना हा बेरिंग असलेला बॉल फेकून तो कोणत्या दिशेने पकडतात याचा अभ्यास करण्यात येतो. या अभ्यासातून त्याच्या श्रवण शक्तीचा अंदाज प्रशिक्षकांना येतो. त्यानंतर त्याला खेळातील पुढील प्रशिक्षण देण्यात येते. औरंगाबादच्या टीमचा बी 1 गटातील बारा वर्षाचा युवराज सांगळे हा टीमच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरला. त्यानं सेमी फायनल आणि फायनलमध्ये टीमच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. आगामी काळात वरिष्ठ गटातील स्पर्धा गाजवण्याची इच्छा त्यानं बोलून दाखवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.