विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी
सोलापूर, 27 नोव्हेंबर : सोलापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर विमानतळ संदर्भात आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संचालक काडादी यांनी चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून केतन शाह यांना धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या संबंधीचा व्हिडिओही समोर आला आहे.
नेमकं काय घडलं -
सोलापूर विमानतळ संदर्भात केतन शाह हे उपोषण करत आहेत. या उपोषणस्थळी येऊन ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी उपोषणकर्ते केतन शाह यांना दमदाटी केली. धर्मराज काडादी आणि केतन शाह यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गुन्हा दाखल करायचा कि नाही या संदर्भात विचार सुरू आहे, अशी माहिती केतन शाह यांनी दिली आहे. तर धर्मराज काडादी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सोलापूर विमानतळ संदर्भात सुरू असलेल्या आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची, रि्व्हॉल्व्हर काढून धमकवलं pic.twitter.com/aaiYzlw0lw
— News18Lokmat (@News18lokmat) November 27, 2022
हेही वाचा - ...म्हणे प्रेमात अडसर, प्रियकराच्या मदतीने मामाच्याच मुलीचा केला गेम; बीड हादरलं!
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर विकार मंचाचे चक्री उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या ठिकाणी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज कडादी आणि सोलापूर मंचचे केतन शहा यांच्यात वादावादी निर्माण झाली. यानंतर याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाचाबाचीदरम्यान, तुम्हाला गोळ्या घालीन अशी धमकी धर्मराज कडादी यांनी आपल्याला दिल्याचा गंभीर आरोप मंचचे केतन शहा यांनी केला आहे.
तीन आठवड्यांपासून उपोषण सुरू -
सोलापूर विकास मंचचे तीन आठवड्यापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. सोलापुरात दररोज विमानसेवा सुरू व्हावी, अशी या उपोषण कर्त्यांची मागणी आहे. तर या विमानसेवेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. ही चिमणी लवकरात लवकर पाडली जावी, यासाठी तीन आठवड्यांपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर विकास मंचचे उपोषण सुरू आहे. यानंतर आता धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.