प्रीतम पंडित, बार्शी, 12 एप्रिल : बार्शीत सूनेने सासूची हत्या करून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याची घटना समोर आलीय. सूनेने घरात केलेली चोरी सासूला कळल्यानं तिने धक्कादायक पाऊल उचललं. वैद्यकीय अहवालातून हा सर्व प्रकार उघडकीस आला. सुनने घरातील दागिन्यांसह पैसे चोरी केले होते हे लपवण्यासाठी सुनेने सासूचा काटा काढला त्यानंतर सुनेने खुनाचा बनाव केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, 8 एप्रिल रोजी राहत्या घरी निर्मला महादेव धनवे या महिलेचा मृतदेह आढळला आला होता. बार्शी शहर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली होती. डॉ. रवींद्र माळी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर वैदयकिय अहवालात महिलांचा मृत्यु हा डोक्यास गंभीर जखम करून गळा आवळुन झाल्याचे समोर आले आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून माहिती घेतली होती.
निर्मला महादेव धनवे यांचे मागील आठ दिवसापासून पैसे, मिनीगंठन चोरल्याचे कारणावरून सासु निर्मला, सुन कोमल यांच्या वाद चालू होते. यातून वाद विकोपाला गेले होते. कोमल अनिल धनवे हिने घरामध्ये कोणी नसताना सासु निर्मला हिचा गळा आवळून डोक्यात जखम करून मारून टाकले. खून लपवण्यासाठी कुभांड रचत निर्मला हि पडून जखमी होवून मुत्यु झाल्याचा बनाव केल्याचा अहवालानंतर निष्पन्न झाले आहे. यातील सून कोमल धनवे हिस अटक केली असून याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल अधिक तपास करीत आहे.