मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ranjitsinh Disale : सोलापूरच्या रणजितसिंह डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची Fulbright स्कॉलरशिप

Ranjitsinh Disale : सोलापूरच्या रणजितसिंह डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची Fulbright स्कॉलरशिप

सोलापूरच्या डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची Fulbright स्कॉलरशिप

सोलापूरच्या डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची Fulbright स्कॉलरशिप

Ranjitsinh Disale fulbright scholership: सोलापूरच्या डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे.

सोलापूर, 4 डिसेंबर : ग्लोबर टीचर अवॉर्ड विजेते सोलापुरातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना आता अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट (Fulbright) स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. ही प्रतिष्ठेची असलेली स्कॉलरशिप संपूर्ण जगभरातील एकूण 40 शिक्षकांना यंदा देण्यात आली आहे. (Ranjitsinh Disale get Fulbright scholarship)

लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत. याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजींनी सांगितले. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.

जगभरातील प्रतिभावान शिक्षकांना एकत्र आणून जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शैक्षणिक संशोधन करण्याची संधी यामुळे मिळते. अमेरिकेतील शिक्षणपद्धती जवळून अभ्यासण्याची संधी यामुळे मिळते. ही शिष्यवृत्ती अमेरिकन सरकारडून दिली जात असून यंदाचे हे 75 वे वर्ष आहे.

वाचा : ग्लोबल टिचर अवार्ड मिळवणारे रणजितसिंह डिसले गुरुजींची आणखी एक अचिव्हमेंट

जगात गाजलेला ‘डिसले पॅटर्न’

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार ( Global Teacher Award) मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale,) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गेल्यावर्षी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी डिसले यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना राज्य सरकार पूर्ण मदत करेल असं आश्वासनही दिलं होतं. राज्यात प्राथमिक शिक्षणात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने एक टास्क फोर्स तयार केला आहे. त्याच्या माध्यमातून आता ‘डिसले पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात क्यूआर कोडची सुविधा सर्वांत आधी रणजित यांनी सुरु केली. याचबरोबर 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारला देखील त्यांनी या पद्धतीने सर्व सिलॅबस जोडण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. त्यानंतर आता सरकारने सर्व श्रेणीच्या विद्यार्थ्यांमधे राज्य सरकार क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. एनसीईआरटीनेदेखील याची घोषणा केली आहे.

क्यूआर कोडचा (QR Code) क्विक रिस्पॉन्स कोड हा फुलफॉर्म आहे. बारकोडच्या पुढील जनरेशनमधील हा कोड असून यामध्ये विविध माहिती सुरक्षित राहते. चौकोनी आकाराचा हा कोड असून आपल्या नावाप्रमाणेच फास्ट काम करण्याचे कार्य हा कोड करतो. पुस्तक असो किंवा वेबसाईट असो सर्व प्रकारची माहिती या क्यूआर कोडमध्ये समाविष्ट असते.

First published:

Tags: School teacher, Solapur