Home /News /maharashtra /

ट्रकची धडक; वारकऱ्यांच्या दिंडीचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 30-40 जखमी

ट्रकची धडक; वारकऱ्यांच्या दिंडीचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 30-40 जखमी

पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर येतेय. वारकऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळतेय.

    पंढरपूर, 14 मार्च: पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर येतेय. वारकऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातात  पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर  30 ते 40 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. सोलापूर - पुणे महामार्गावर कोंडी गावाजवळ ही घटना घडली आहे. वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. सर्व वारकरी तुळजापूरहुन पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. अद्याप या अपघातातील मृतांची नावे समजली नाहीत. तसेच जखमींमध्ये समावेश असलेल्या एका किशोरवयीन मुलासह चार महिलांचीही नावे समजली नाहीत. राम शिंदे (वय ३०), मच्छिंद्र गोरे (वय ५६), आनंद मिसाळ (वय ६०), समाधान शिवाजी कदम (वय ४०), आकाश किसन गिरी (वय ६५), मंदा कदम (वय ५०), सुलभा साळुंखे (वय ५०), जयश्री साळुंखे (वय ५०), नागनाथ साळुंखे (वय ४०), समर्थ साळुंखे (वय १६), निर्मला कदम (वय ४०), शीतल शिंदे (वय ३५), शुभम अंकुश शिंदे (वय १५), समर्थ अंगद मिसाळ (वय ६) अशी ओळख पटलेल्या अन्य जखमींची नावे आहे. अपघातातील मृत आणि जखमी असे सर्वजण वारकरी सांप्रदायातील असून तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील राहणारे आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Pandharpur (City/Town/Village), Solapur

    पुढील बातम्या