मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना, बहिण-भावाचा मृत्यू; कुटुंबातील सदस्य अत्यवस्थ

दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना, बहिण-भावाचा मृत्यू; कुटुंबातील सदस्य अत्यवस्थ

राहाता तालुक्यातील पाथरे गावात ही दुर्घटना घडली.

राहाता तालुक्यातील पाथरे गावात ही दुर्घटना घडली.

राहाता तालुक्यातील पाथरे गावात ही दुर्घटना घडली.

अहमदनगर, 25 ऑक्टोबर : ऐन दसऱ्याच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. अरहान (वय 5) वर्ष आणि आयेशा (वय 4) अशी मृत बहिण भावाची नावं आहेत. राहाता तालुक्यातील पाथरे गावात ही दुर्घटना घडली. दसऱ्याचा सन हा आनंदाचा सन मानला जातो. मात्र याच आनंदाच्या सणादिवशी वसिम शेख यांच्या कुटुंबाला मोठा धक्का सहन करावा लागला. शेख यांच्या चिमुकल्या मुला-मुलीवर काळाने घाला घातला. अन्नातून विषबाधा झाल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. धक्क्याने कुटुंबातील काही सदस्य अत्यवस्थ भाचा आणि भाचीच्या मृत्यूच्या बातमीने त्यांचा मामाही अत्यवस्थ झाल्याचं कळतंय. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच आजीची प्रकृतीही खालावली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. हेही वाचा- औरंगाबाद हादरलं, निलंबित नायब तहसीलदाराच्या मुलाची 20 पानी सुसाईट नोट लिहून आत्महत्या दरम्यान, सणासुदीदिवशी घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शेख कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
First published:

Tags: Ahmednagar

पुढील बातम्या